माझा तर काय नेमच नव्हता, कोणाला वाटत नव्हतं मी निवडून येईल पण…- धनंजय मुंडे

मुंबई | राज्यातील राजकारणात अतिशय प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या मुंडे घराण्यातील भावा- बहिणीची जोडी म्हणजेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकेमेकांसमोर उभे ठाकले होते.

पंकजा या भाजपच्या वतीने तर, धनंजय हे राष्ट्रवादीच्या वतीने निवडणूक लढवत होते. या लढतीमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना पिछाडीवर टाकत परळीचा गड राखला होता. या निवडणुकीत मी विजयी होईल असं कोणालाच वाटत नव्हते, असे धनंजय मुंडे यांनी स्वतःच सांगितलं आहे.

राज्यात सध्या नगरपंचायतीच्या निवडणुका सुरु आहेत. त्यामध्ये कर्जत नगरपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजपचे नेते राम शिंदे यांनी प्रतिष्ठेची केली आहे.

राष्ट्रवादीची कर्जतमध्ये शुक्रवारी प्रचारसभा झाली. त्या वेळी धनंजय मुंडे, गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल उपस्थित होते. या वेळी मुंडे यांनी भाजप नेते माजी मंत्री राम शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली.

धनंजय मुंडे म्हणाले, रोहित पवारांनी मतदार संघात जादू केली. 20 वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मतदार संघात रोहित पवार येताच आमदार झाले. नगरपंचायतची एक जागा बिनविरोध झाली, असं त्यांनी सांगितलं.

गेल्या विधानसभा निवडणुकीत 12 खात्यांच्या मंत्र्याला पराभवाची धूळ चारली. त्या वेळी राज्यात दोनच निवडणुकांची चर्चा झाली. एक आमची (परळीची) आणि दुसरी रोहित पवार यांची, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.

मी प्रचारासाठी आलो होतो, त्या वेळी रोहित पवार 35 हजार मतांनी निवडून येतील असा अंदाज होता. मात्र, तुम्ही त्याही पुढे गेलात. माझा तर काय नेमच नव्हता. कोणाला वाटत नव्हते मी निवडून येईल, पण मी 31 हजारांनी आलो, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही” 

मोठी बातमी! मंत्री नवाब मलिक यांना आणखी एक झटका 

‘बंगळुरूतील त्या समाजकंटकांना शोधून काढा’; अजित पवारांचा कर्नाटकला इशारा 

‘…तसं महाराष्ट्रात पुन्हा झाल्यास सोडायचं नाही’; राज ठाकरेंचा इशारा 

अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन; ‘या’ कृतीची महाराष्ट्रभर चर्चा