Top news पुणे महाराष्ट्र

“गोपीनाथ मुंडेंच्या वारसदारांना संधी मिळाली होती पण…”

pankaja munde and dhananjay munde 1

पुणे | गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचं उद्घाटन आज पार पडलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ऑनलाईन या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

गोपीनाथ मुंडे यांनाही वाटत होतं की, एखादं महामंडळ असावं पण त्यांच्या रजकीय कारकिर्दीत ते झालं नाही. त्यांच्या राजकीय वारसदारांना संधी मिळाली पण त्यांनाही जमलं नाही, असं म्हणत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर टीकास्त्र सोडलंय.

कदाचित नियतीला मुंडे साहेबांचं हे स्वप्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझ्यावर द्यावी तरच हे होऊ शकतं… आज खऱ्या अर्थाने मुंडे साहेबांना महामंडळाच्या माध्यमातून आदरांजलीच आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

नेता आपला असा असावा. अभिमान वाटतो सांगायला की, पहिल्या अर्थसंकल्पात ऊसतोड मजुरांच्या महामंडळाची घोषणा तर केली, असं धनंजय मुंडेंनी सांगितलं आहे.

महामंडळाला भविष्यात पुढे कसलीच आर्थिक अडचण येऊ नये म्हणून या महाराष्ट्रात गाळप केला जाणारा प्रत्येक टनामागे 10 रुपये ऊसतोड मजुरांच्या कल्याणासाठी जर कोणी ठेवले असलतील तर ते फक्त अजित पवारांनी, असं धनंजय मुंडेंनी सांगितलं.

दरम्यान, पुढच्या काळात आर्थिक अडचण कधीच येणार नाही. त्यामुळे ही पिढी आणि पुढची पिढी महामंडळाला कधीच विसरू शकत नाही असंही मुंडेंनी सांगितलं

महत्त्वाच्या बातम्या- 

युक्रेनमधून भयंकर बातमी समोर, युक्रेनच्या मंत्र्याचा अत्यंत धक्कादायक दावा 

पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबता थांबेना; आज ‘इतक्या’ रूपयांनी पेट्रोल महागलं 

‘…म्हणून मी राज ठाकरेंच्या घरी गेलो होतो’; गडकरींनी स्पष्टच सांगितलं 

Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी 

  ‘भाजपला राज ठाकरेंना सोबत घेणं परवडणारं नाही’; रामदास आठवलेंचा हल्लाबोल