मुंबई | एखादा मंत्री त्याच्या विधानसभा मतदारसंघातून पराभूत होतो तेव्हा त्या नेत्याला पुनर्जीवित करण्यासाठी उमेदवारी देणं साहजिक आहे. पण पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेतलं नाही. हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता, असं राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. ते ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.
मी भाजप सोडून बराच काळ झाला आहे, त्यांनतर भाजपमध्ये नवं पर्व सुरु झालंय. पंकजा मुंडे यांना उमेदवारी का दिली नाही हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारली असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपकडून डावलण्यात आलं आहे.
दरम्यान, भाजपच्या या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नाही. भाजपच्या त्या चारही उमेदवारांना आशिर्वाद, अशी प्रतिकिया पंकजा मुंडे यांनी दिली होती.
महत्वाच्या बातम्या-
-‘मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका तर…’; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
-‘मनसेकडून शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान’; शिवसेनेसह इतर संघटनांचा आरोप
-तुकोबा आणि माऊलींच्या पालख्या सज्ज; ‘इतक्या’ वारकऱ्यांसह प्रस्थानास परवानगी
-गुडन्यूज! भारतानं मान्यता दिलेल्या कोरोनाविरोधातील औषधाला मिळालं ‘हे’ मोठं यश
-‘या’ गोष्टीमुळे काँग्रेस नाराज; मुख्यमंत्र्यांशी स्वतंत्र चर्चा करणार