“भाजपच्या डोक्यात सत्तेची मस्ती आलेली असून देशातील लोकशाही संकटात आहे”

मुंबई : शिखर बँकेतील घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र नोटीस नसतानाही शरद पवार ईडी कार्यालयात स्वत:हून हजर राहणार आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे.

देशात लोकशाही राहिली की नाही? हा प्रश्नच आहे. आचारसंहिता लागल्यानंतर लगेच कारवाई कशी? ईडी कारवाई करुन आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची भावना आहे. नाव नसताना शरद पवारांवर गुन्हा कसा नोंद झाला? भाजपच्या डोक्यात सत्तेची मस्ती आलेली आहे. आमच्या कारवाई का केली याबाबत विचारणा करण्याचा आम्हाला अधिकार आहे, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

कायदा हातात न घेता मुस्कटदाबी होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस कधीही सहन करणार नाही. देशातील लोकशाही संकटात आहे. शरद पवारांकडूनही कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे, असं असताना पोलिसांकडून कार्यकर्त्यांना पकडण्यात येत आहे असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे.

कार्यकर्त्यांची धरपकड करुन दबावतंत्राचा वापर केला जात आहे. कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी ईडी आणि पोलिसांची आहे असं त्यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-