आता कोणत्याही गडावरुन कसलंच राजकारण नाही, तर विकास होईल- धनंजय मुंडे

बीड | ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यात त्यांनी नारायण गडावर जाऊन महंतांचे आशीर्वाद घेतले. आता कोणत्याही गडावरुन कसलंच राजकारण नाही तर विकास होईल, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

सध्या माझ्याकडे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे गडाच्या विकासासाठी आता महंतांना कुठलीच मागणी करावी लागणार नाही. जिल्ह्यातील गडांच्या विकासाची जबाबदारी आमची आहे, अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली.

आम्ही गडावर येऊन आशीर्वाद घेतले आहेत आणि आता या ठिकाणाहून राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासाला सुरुवात करणार आहोत, असं धनंजय मुंडे  यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आम्हाला कोणालाही वाटलं नव्हतं की मी मंत्री होईन. मात्र आता मंत्री झालोय. त्यामुळे सर्वाधिक विकास बीड जिल्ह्याचा करायचा आहे. मी आज नारायणगडावर आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-