महाराष्ट्र मुंबई

धनगर समाजासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा!

मुंबई : धनगर समाजाचा अनुसूचित जातींमध्ये समावेश करण्याची मागणी तीव्र होत आहे. त्यातच आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

अनुसूचित जातींमधील सर्व सवलती आता धनगर समाजाला लागू होणार आहेत. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारने डिसेंबरमध्ये घोषणा केली होती. त्या घोषणेचं त्यांनी निर्णयात रुपांतर केलं आहे.

महाराष्ट्रात अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना 22 योजना दिल्या जातात. त्या आता धनगर समाजातील नागरिकांनाही लागू होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समजाची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. 

महाराष्ट्रात धनगर समाज सध्या NT अंतर्गत आरक्षण दिलं आहे. मात्र धनगर समाजाने अनुसूचित जातींमध्ये समावेश करण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. पण हा मुद्दा राज्याच्या नाही तर केंद्राच्या अंतर्गत येतो.

राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करण्याची मागणी धनगर समाजाकडून करण्यात येत होती. 2014 साली देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं.

मुख्यमंत्र्यांनी त्यांचा कार्यकाल संपत आला तरीही धनगर समाजाला अनुसूचित जातींमधील आरक्षण दिलं नाही. मात्र राज्य सरकारने थेट आरक्षण न देता अनुसुचित जातींमध्ये मिळणाऱ्या सुविधा देऊ केल्या आहेत.  

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पिचडांना मतदारसंघातील लोकांकडून धक्का!

वेल्हा तालुक्याचा ‘राजगड’ करा; सुप्रिया सुळेंची मागणी

-राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी का दिली???; शिवेंद्रराजे भोसले म्हणतात…

-‘राष्ट्रवादी’ला सर्वात मोठा धक्का; साताऱ्यातील राजांचा राजीनामा

-पुढच्या 15 वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही- चंद्रकांत पाटील

IMPIMP