कागदोपत्री आकड्यांचा मेळ घालून सादर केलेला अर्थसंकल्प; धीरज देशमुखांची टीका

मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केलं आहे. अडीच तासांपेक्षा जास्त अधिक कालावधी हा अर्थसंकल्पाचे वाचन करण्यासाठी लागला. या अर्थसंकल्पावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर काँग्रेस नेते आणि आमदार धीरज देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा प्रचंड निराशा जनक आहे़, असं धीरज देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

कागदोपत्री आकड्यांचा मेळ घालून सादर केलेला हा अर्थसंकल्प आहे, असा आरोप धीरज देशमुख यांनी केला आहे. तसेच अर्थसंकल्प परिणामशून्य असून शेतकरी वर्गाला पुन्हा एकदा दुय्यम स्थान देण्यात आलं असल्याचं धीरज देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरकारने लोकप्रिय घोषणा केल्या असल्या तरी त्यासाठी निधी कसा उपलब्ध करणार हा प्रश्न अनुतरित आहे. केंद्रातील भाजप सरकार त्यांच्याकडे असलेल्या कंपन्यांचे खासगीकरण करून देशाला मागे घेऊन जात असल्याचं धीरज देशमुख यांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-लोणीकरांचं ते वक्तव्य आक्षेपार्हच… मी त्यांचं समर्थन करणार नाही- चित्रा वाघ

-गोंधळलेल्या अर्थमंत्र्यांनी गोंधळलेला अर्थसंकल्प मांडला- जयंत पाटील

-मोदी सरकारच्या बजेटवर रोहित पवारांचं टीकास्त्र; म्हणाले ‘हा तर गंडवागंडवीचा अर्थसंकल्प’!

-“नशिब ही गोष्ट जेवणापुर्ती मर्यादित राहिली नाहीतर गांधीजींच्या आत्म्यानं स्वर्गात आपलं चैतन्य गमावलं असतं”

-अहो आव्हाडजी, अदिवासींच्या घरात खुर्च्या, टिपोय, मिनरल वॉटर कुठून आलं?