खेळ देश

आयपीएलमध्ये 100 झेल घेणारा धोनी दुसरा यष्टिरक्षक, पहिल्याचं नाव ऐकाल तर चकीत व्हाल!

नवी दिल्ली | क्रिकेट खेळात काही ना काही विक्रम होतच असतात. कुणी जुने विक्रम मोडीत काढतात तर कुणी नवे विक्रम प्रस्थापित करतात. आता हे विक्रम काही रोज होत नाही. पण सध्या आयपीएलमध्ये रोज एक खेळाडू काहीतरी नवीन विक्रम करतोय, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.

क्रीडा रसिकांना चेन्नई सुपर किंग्ज संघ हळूहळू दरवर्षी जसं ते खेळतात, अगदी तसच खेळण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतेच चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधार महेंद्र सिंह धोनी अजून एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

महेंद्र सिंह धोनी हे आयपीएलमध्ये १०० पेक्षा जास्त झेल घेणारे दुसरे यष्टिरक्षक बनले आहे. रविवारी संध्याकाळी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज यांचा सामना पार पडला.

या सामन्यामध्ये महेंद्र सिंह धोनी याने हा विक्रम केला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या १८ वी षटक शार्दूल ठाकूर टाकत होते. त्यांच्या एका चेंडूवर केएल राहुलचा झेल घेऊन महेंद्र सिंह धोनी यांनी हा विक्रम पूर्ण केला.

या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाला १० बळींनी हरवले. भारताचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांनी १९५ आयपीएलचे सामने खेळले आहे. यात त्यांनी १३९ बळी घेतले आहे, त्यात १०० झेलांचा समावेश आहे.

या यादीत पहिल्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधार दिनेश कार्तिक यांनी हा विक्रम केलेला आहे. दिनेश कार्तिक यांनी १८६ आयपीएल सामने खेळले आहे. त्यात त्यांनी १३३ बळी घेतले आहे. यात १०३ झेल आणि ३० स्टंप आऊट यांचा समावेश आहे.

तिसऱ्या क्रमांकावर यादीत रॉबिन उथप्पा यांचा क्रमांक लागतो. रॉबिन उथप्पा यांनी ९० बळी घेतले आहे. यात ५८ झेल यांचा समावेश आहे. सध्या चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमध्ये पाच सामने खेळली आहे, त्यात फक्त दोनच सामने जिंकलेली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत बुधवारी होणार आहे. नुकतेच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी संध्याकाळी महेंद्र सिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. महेंद्र सिंह धोनी यांनी देशासाठी ३५० एक दिवसीय सामने, ९० कसोटी सामने आणि ९८ टी-२० सामने खेळले आहे.

आयपीएलमध्ये सलग तीन सामने चेन्नई सुपर किंग्ज हरली होती. पण त्यानंतर संघाने किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध शानदार विजय मिळवला. सलामीवीर शेन वॉटसन यांनी ८३ धावा आणि ड्यूप्लेसीस यांनी ८७ धावा केल्या. शेवटपर्यंत बळी न जाता दोघेही खेळत राहिले आणि विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

अनुरागवर लैं.गिक छ.ळाचा आरोप करणाऱ्या पायलचा ‘त्या’ वक्तव्यावरून यूटर्न, माफी मागायलाही तयार

नेहा कक्करच्या लग्नाची वार्ता ऐकताच नेहाचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहली म्हणाला…

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! रियाच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाचा निर्णय

बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का! ‘या’ बड्या दिग्दर्शकाचं नि.धन

नोरा फतेहीचा ‘प्यार दो, प्यार लो’ गाण्यावर जलवा, असा डान्स तुम्ही पाहिलाच नसेल!