खेळ देश

आयपीएलमध्ये धोनीनं केला ‘हा’ कारनामा; सुरेश रैनाला टाकलं मागे!

नवी दिल्ली | २०२० वर्षातील आयपीएलच्या मोसमातील काल १३ वा सामना पार पडला. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पार पडला. सनरायजर्स हैदराबाद यांनी नाणेफेक जिंकला आणि त्यांनी फलंदाजी केली.

महेंद्र सिंह धोनी जेव्हा आपल्या चेन्नई सुपर किंग्ज संघासह गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. त्याच वेळी महेंद्र सिंह धोनी यांनी इतिहास रचला. आता तुम्ही विचार कराल की, कोणी फक्त मैदानात उतरल्यावर कसा इतिहास रचू शकेल, तर ते कसं आपण जाणून घेऊ.

आयपीएलमध्ये सर्वात जास्त सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावर महेंद्र सिंह धोनी पोहोचले आहे. सनरायजर्स हैदराबादविरुद्ध महेंद्र सिंह धोनी १९४ वा सामना खेळत होते. या विक्रमात त्यांनी भारतीय संघाच्या फलंदाज सुरेश रैना यांनाही मागे टाकले आहे.

सुरेश रैना हे काही कारणांमुळे या मोसमातील आयपीएल खेळण्यास उपस्थित नाही. सुरेश रैना हे १९३ वा सामना विविध संघासोबत खेळलेले आहे. त्यातच महेंद्र सिंह धोनी आता १९४ वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले आहे.

महेंद्र सिंह धोनी हे चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त रायजिंग पुणे सुपरजायंट या संघाबरोबर आयपीएलचा सामना खेळले आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त सामने खेळणाऱ्या यादीत पहिल्या स्थानावर महेंद्र सिंह धोनी यांचा क्रमांक लागतो. या यादीत सुरेश रैना हे दुसऱ्या स्थानावर आहे.

मुंबई इंडियन्सचे कर्णधार रोहित शर्मा यांचे तिसऱ्या क्रमांकावर नाव आहे. १९२ वा सामना रोहित शर्मा हे मुंबई इंडियन्स आणि डेक्कन चार्जर्स हैदराबाद या संघांबरोबर खेळले आहे. या यादीत चौथ्या क्रमांकावर दिनेश कार्तिक यांचे नाव आहे, त्यांनी १८५ सामने खेळले आहे.

पाचव्या क्रमांकावर विराट कोहली आणि रॉबिन उथप्पा यांचे नाव आहे, या दोन्ही खेळाडूंनी १८० सामने खेळले आहे. सुरेश रैना यांनी ट्विट केले,”आयपीएलमध्ये सर्वात जास्त सामने खेळणाऱ्या माही भाईला शुभेच्छा. मला आनंद आहे की, माझा विक्रम आपण तोडला. आजच्या खेळासाठी शुभेच्छा आणि मला विश्वास आहे की, हा मोसम सीएसके जिंकेल.”

काही महिन्यांपूर्वी भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनी भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर लगेचच भारताचा फलंदाज सुरेश रैना यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घेतली.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोना काळात डिप्रेशनमधून कसे वाचावे ? गायक हरिहरन यांनी सांगितल्या सोप्या टिप्स…

सुशांतला न्याय मिळणार का याबाबत साशंकता?; जिजाने शेअर केला ‘हा’ फोटो

‘आयएएस’च्या स्वप्नाआड पैशांची आली अडचण, तिथंही धावून आला सोनू सूद!

रोहित शर्माने आयपीएलमध्ये रचला नवा रेकॉर्ड, विराट कोहलीलाही टाकलं मागे!

अंकिता लोखंडेनं शेअर केला ‘हा’ व्हिडीओ, सुशांतच्या चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल