खेळ

…म्हणून रोहित शर्माच्या जागी महेंद्रसिंग धोनीला पुन्हा बनवलं कर्णधार

आशिया चषकात भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानला दोन वेळा पराभूत केल्यानंतर भारतीय संघाचं जोरदार कौतुक होत आहे. आशिया चषकात भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्मासाठी सुद्धा ही आनंदाची बाब आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चमकदार कामगिरी करत असल्याने त्याचे चाहते तर खूश आहेतच मात्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव देखील सुरु आहे. आज भारताचा सामना अफगानिस्तानविरुद्ध आहे. या सामन्यात मात्र एक चमत्कारिक घटना घडली आहे. रोहित शर्माचे चाहतेच नव्हे समस्त क्रिकेटरसिक यामुळे कोड्यात पडले आहे. रोहित शर्माचं कर्णधारपद काढून ते चक्क धोनीकडे देण्यात आलं आहे. स्वतः धोनीसाठीसुद्धा हा एक अनपेक्षित निर्णय होता.

धोनीकडे का सोपवलं कर्णधारपद?

आशिया चषकात भारतीय संघ खूपच चांगली कामगिरी करत आहे. या स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत देखील पोहोचला आहे. त्यामुळे काही खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापनानं घेतला आहे. विश्रांती देण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये रोहित शर्माचा समावेश आहे. त्यामुळे कर्णधारपदाची माळ अनपेक्षितरित्या महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावर पडली. नाणेफेकीसाठी धोनीनं मैदानात पाऊल ठेवताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

धोनीसाठी ठरला विक्रमी सामना-

धोनीच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडल्यामुळे त्याच्यासाठी हा विक्रमी एकदिवसीय सामना ठरला आहे. याआधी धोनीनं 199 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळे भारतीय संघाचं नेतृत्व करण्यामध्ये धोनीनं द्विशतक पूर्ण केलं आहे. 

“कर्णधारपदाची माळ अचानक आणि नशिबाने माझ्या गळ्यात पडली. मला हे पुन्हा घडतंय यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. मी आतापर्यंत 199 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. आता 200 व्या सामन्यात नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली आहे. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे- महेंद्रसिंग धोनी

 

IMPIMP