मनोरंजन

“व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा सगळ्यांना घेऊन बुडणार एक दिवस”

मुंबई | पहिल्या दोन टप्प्यांनंतर तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेताना केंद्र सरकारनं काही प्रमाणात शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर राज्यांनीही स्थानिक परिस्थितीचा विचार करत काही निर्णय घेतले आहेत. यात दारूची दुकानं सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

दारूची दुकानं उघडणार म्हणून तळीरामांनी लांबच लांब रांगा लावल्या. मद्याच्या मोहापुढे तळीरामांना सोशल डिस्टसिंगचाही विसर पडला. याबाबत ‘धुरळा’चा लेखक क्षितिज पटवर्धन याने सोशल मीडियावर त्याचं परखड मत मांडलंय.

व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा आणि सो कॉल्ड कुलनेस सगळ्यांना घेऊन बुडणार एक दिवस. किलोमीटर भर रांगा लागल्यात दारूच्या दुकानाबाहेर, अशी पोस्ट क्षितिजने फेसबुकवर लिहिली आहे.

दरम्यान, अनेकांनी दारूची दुकानं सुरू होण्यापूर्वीच सकाळी रांगेत उभं राहण्यास सुरुवात केली. मात्र हळूहळू रांग वाढत गेल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपने विधानपरिषदेची एक जागा ‘रिपाइं’ला सोडावी- रामदास आठवले

-UPSC परीक्षेसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय

-“मजूरांकडून रेल्वेभाडं घेणार नाही तर प्रत्येकी पाचशे रुपये मदत देणार”

-परदेशातील भारतीयांना विमानातून फुकट आणलं, मग स्थलांतरित कामगारांकडूनच पैसे का?- प्रकाश आंबेडकर

-रिंकू राजगुरुनं शेअर केला हॉट लूक; लाईक करायला उडाली चाहत्यांची झुंबड