Top news विदेश

वर्षभर सेक्स न करताही गर्भवती राहिली तरुणी? पोटदुखीमागे डॉक्टरांनी सांगितलं गजब कारण

Photo Credit- Pixabay

लंडन | आई होणं ही प्रत्येकच महिलेसाठी आनंदाची बाब असते. परंतु विना सेक्स करता देखील गर्भवती असल्याचा रिपोर्ट येणं, ही एक धक्क्याची बाब आहे. असाच प्रकार आता लंडन मधील एका तरुणीसोबत घडला आहे.

या तरुणीचं नाव सामंथा गिब्सन असं आहे. सामंथाने सोशल मीडियावर तिची कहाणी शेअर केली आहे. सामंथाने वर्षभर कोणाशीच शारिरीक संबंध ठेवले नाहीत तरी देखील डॉक्टरांनी तिला गर्भवती असल्याचं सांगितलं. यामुळे तिला मोठा धक्का बसला होता.

सामंथाने टिकटॉकवर सुरुवातीला एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली होती की, एक वर्षाहून अधिक काळ मी शारिरिक संबंध ठेवले नसतानाही डॉक्टरांनी मी गर्भवती असल्याचं सांगितलं आहे. कोणाला याबाबत काही माहीत असेल तर सांगा.

सामंथाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल झाला. हा व्हिडीओ तब्बल 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला. सामंथाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिला यामागची वेगवेगळी कारणे देखील समजावून सांगितली. तर काहिंनी तिची कहाणी विस्तृतपणे ऐकण्याची इच्छा बोलून दाखवली. काही दिवसांनी सामंथाने आणखी एक व्हिडीओ शेअर करत डॉक्टरांकडून हे नजरचुकीने झाल्याचं सांगितलं.

या व्हिडीओमध्ये ती म्हणाली की, डॉक्टरांनी चुकून तिला दुसऱ्याचा रिपोर्ट दिला होता. गेल्या काही दिवसांपासून मला चक्कर येत होती. उलट्या होत होत्या. यानंतर डॉक्टरांनी मला ब्लड टेस्ट करायला सांगितलं. परंतु ब्लड टेस्टमध्ये मी गर्भवती असल्याचं कळल्यानंतर मी हादरून गेले.

मी डॉक्टरांना ही गोष्ट शक्य नसल्याचं सांगितलं, कारण मी गेल्या एक दोन वर्षात कोणाशीच शारिरीक संबंध ठेवले नव्हते. यानंतर डॉक्टरांनी मला स्ट्रिप टेस्ट करण्यास सांगितली तर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, अशी माहिती सामंथाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोठ्या बसला ओव्हरटेक करायला गेला अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

पगार नाही दिला म्हणून कर्मचाऱ्यानी जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

चक्क एका अजगराने गिळलं जिवंत हरिण, पाहा व्हायरल व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! आता होणार चालता बोलता दाढी-मिशी, पाहा व्हायरल व्हिडीओ

शाइनिंग करत माकडासोबत फोटो काढायला गेला अन्…, पाहा व्हिडीओ