एकनाथ खडसे यांचा धक्कादायक खुलासा! चंद्रकांत पाटलांविषयी सांगितलं ‘ते’ सत्य

मुंबई | सध्या महारष्ट्रातील राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टीवर नाराज होते. यामुळे एकनाथ खडसे भाजपला रामराम ठोकणार अशा चर्चा चालू होत्या. अखेर शुक्रवारी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच भारतीय जनता पार्टीविषयी अनेक मोठे खुलासे केले आहेत. एकनाथ खडसे यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं भाजप मधील काही नेत्यांवर आरोप केले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा खडसे यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका करत मोठा खुलासा केला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे आज नाशिकमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी हा खुलासा केला आहे.

आपल्याविरुद्ध भारतीय जनता पार्टीमध्ये कट रचण्यात येत होता. शरद पवार यांनी माझं राजकीय पुनर्वसन केलं आहे. माझं राजकीय करिअर संपवण्याचे काम काही जणांकडून सुरु होतं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

भारतीय जनता पार्टीनं अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि इतरांचे जे हाल केले तेच हाल माझे झाले असते. मात्र, मी गप्प बसणाऱ्यापैकी नव्हतो. मी संन्यास घ्यावा अशी चंद्रकांत पाटलांची इच्छा होती. मी मार्गदर्शन करावं अशीही त्यांची इच्छा होती, असं खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.

मी कोणत्याही पदासाठी नाही तर मतदार संघाच्या विकासासाठी सत्ताधारी पक्षात गेलो आहे. मी घरी बसलो असतो मात्र शरद पवारांनी मला पुन्हा राजकारणात आणलं, असंही खडसे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची कन्या रोहिणी खडसे आणि पत्नी मंदाकिनी यांनी देखील हातावर घड्याळ बांधलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा पक्षप्रवेश झाला. खडसे यांच्यासह तब्बल 72 नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

नंदुरबार तळोद्याचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, बोदवडचे कृषी उत्पन्न बाजार सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद जंगले, बोदवडचे सभापती किशोर गायकवाड, भुसावळचे सभापती मनिषा पाटील या नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सुर्यवंशी, जळगाव जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्षा मंदाताई खडसे, मुक्ताई सहकारी सुतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी, औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे यांच्यासह इतर 72 नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

काय सांगता! ‘ही’ गोष्ट न केल्यास LPG ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही

रावणाच्या कुंडलीत होता फक्त ‘हा’ एकच दोष; नाहीतर त्याचा मृत्यू अशक्य होता!

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीला एनसीबीनं ड्र.ग्ज घेताना रंगेहात पकडलं

तुम्हालाही चमकदार त्वचा हवी आहे का? मग ‘हे’ उपाय जरूर करा

…मी फक्त ‘या’ एका गोष्टीसाठी लग्न केलं; राधिका आपटेचा धक्कादायक खुलासा