‘तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय?’; गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

मुंबई | राजकीय वर्तुळात नेहमी काहीना काही सुरु असल्याचं पहायला मिळतं. नेहमीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळतं.

राज्याच्या अर्थसंकल्पाच्या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी एका पेनड्राईव्ह बाॅम्बचा उल्लेख केला. त्यांच्या या गौप्यस्फोटानं संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली.

दाऊदची माणसं वक्फ बोर्डात नियुक्त करण्यात आली आहेत. या दोघांमधील संवाद समोर आला आहे, असा दावा फडणवीसांनी केला.

देवेंद्र फडणवीसांच्या या पेनड्राईव्ह बाॅम्बवर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दोन दिवसापूर्वी 125 तासांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग असलेला एक पेनड्राईव्ह दिला. आजही एक पेन ड्राईव्ह दिला. तुम्ही ज्या मुदसीर लांबे याचे नाव घेतले. त्यांची वक्फ बोर्डात निवड सरकारने केली नाही. तो निवडून आला आहे.

विनाकरण सगळीकडे दाऊद दाऊद असे करू नका. एकावर एक पेन ड्राईव्ह देऊन आरोप करता आहात म्हणजे तुम्ही काय डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय? असा टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीसांना लगावलाय.

विरोधी पक्षनेते न्यायालयात जाणार असल्याचं सांगत आहेत, याचा आनंद वाटला एका तरी यंत्रणेवर त्यांचा विश्वास आहे, असा खोचक टोलाही वळसे पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे.

दरम्यान, राज्यातील राजकारणात नवनवीन गौप्यस्फोटानं खळबळ माजवली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी काय नवं आणि महत्त्वाचं पहायला मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘काॅंग्रेस मूर्खांच्या नंदनवनात रमलीय’; ‘या’ काॅंग्रेस नेत्याचा हल्लाबोल

  निवडणुकांनंतर Petrol-Diesel दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर

  मोठी बातमी! ….म्हणून मुंबईत ‘इतक्या’ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

  ‘महाविकास आघाडी सरकार केव्हाही पडू शकतं’; काॅंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

  Health | उन्हाळात अशी घ्या स्वतःची काळजी, नाहीतर होतील ‘हे’ गंभीर परिणाम