धनंजय मुंडेंची बॅटिंग पाहिली का?, 157च्या स्ट्राईक रेटनं खेचल्यात धावा; पाहा व्हिडीओ

बीड | राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे राजकारणाच्या मैदानात तुफान फटकेबाजी करताना दिसतात. राजकीय मैदानात अनेक दिग्गज नेत्यांचे घाम देखील काढले आहेत.

अशातच आता धनंजय मुंडे यांनी क्रिकेटच्या मैदानात उतरून जोरदार फटकेबाजी केली आहे. कैलासवासी पंडितअण्णा मुंडे यांच्या स्मृति प्रित्यर्थ क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती.

सरपंच प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी उपांत्य फेरीच्या सामन्यात धनंजय मुंडे मैदानात उतरले.

धनंजय मुंडे स्वतः आता बॅट घेऊन मैदानात आल्यावर लोकांची गर्दी जमली. गोलंदाजांची तारंबळ उडाली. त्यानंतर धनंजय मुंडेंनी फलंदाज आहे, असं समजून टाक असं सांगितल्यानंतर सामना सुरू झाला.

धनंजय मुंडे यांनी 7 चेंडूंचा सामना केला. त्यात त्यांनी 157 च्या स्टाईक रेटने 11 धावा केल्या. यावेळी त्यांनी मनसोक्त फलंदाजी करत 2 चौकार खेचले.

दरम्यान, सामन्याच्या 7 व्या चेंडूवर सिक्स मारण्याच्या नादात धनंजय मुंडे क्लिन बोल्ड झाले. त्यानंतर त्यांनी मैदान सोडलं.

पाहा व्हिडीओ-

महत्त्वाच्या बातम्या – 

“शिवाजी महाराज आहे आमचा लाडका राजा, एप्रिलमध्ये वाजवून टाकू ठाकरे सरकारचा बाजा”

सीमेवर लढताना अवघ्या 23 व्या वर्षी सांगलीच्या सुपुत्राला वीरमरण; संपूर्ण देश हळहळला

SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आता कार्ड हरवलं तर…

“मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार होतो म्हणूनच मला डावलण्यात आलं, मी टरबुज्या म्हणणार नाही पण…”

“आम्ही मराठ्यांच्या पोटचे नाही का?, आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का?”