मुंबई | महाराष्ट्रात सध्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
राज्यात विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहत असताना भाजपला मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या बड्या नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
उस्मानाबाद येथील नेते दिग्विजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दिग्विजय शिंदे यांनी हाती घड्याळ बांधलं आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकिय वातावरण तापलं आहे. त्यात शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.
दिग्विजय शिंदे यांनी त्यांच्या वडिलांच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. वडील भाजपमध्ये असताना त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करायचं ठरवलं याचं आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
दिग्विजय शिंदेंसोबत अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं देखील अजित पवार म्हणाले. तर दिग्विजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करायचा धाडसी निर्णय घेतला असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, दिग्विजय शिंदे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने मोठा राजकीय भूकंप झाला आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का बसल्याने सर्वाचं लक्ष आता विधानपरिषद निवडणुकीकडे लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“अग्निपथ योजना म्हणजे सरकारचं दिशाहीन पाऊल”
‘हे बदल म्हणजे आभाळाला ठिगळ लावल्यासारखं’, रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका
“नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासूनच विकासाला सुरूवात झाली”
अग्निपथ योजनेवरून संजय राऊत मोदी सरकारवर बरसले, म्हणाले…
बिचुकलेंचं एकच लक्ष, आता राष्ट्रपतीपद फक्त; लवकरच उमेदवारी अर्ज भरणार