काश्मीरला वाचवणं आपलं कर्तव्य आहे- दिग्विजय सिंह

नवी दिल्ली : काश्मीरची समस्या लवकर सोडवली नाही, तर काश्मीर आपल्या हातातून जाईल, अशी भीती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केली आहे. लोकसभेत आमच्याकडे बहुमत नाही. हे आम्हाला माहिती आहे. पण सात पक्षांनी सहकार्य केलं असतं तर विरोधी पक्ष आज राज्यसभेत बहुमतात आला असता, विरोधी पक्षाच्या असहकार्यावर असंतोष व्यक्त करताना दिग्विजय सिंह म्हणालेे आहेत.   

दिग्विजय सिंह यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना याबाबत आवाहन केले आहे.

जर जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवलं तर त्याचे गंभीर परिणाम होतील. आता काश्मीर जळत आहे. देशाच्या 70 वर्षांच्या इतिहासात एखाद्या राज्याचे केंद्रशासीत प्रदेशात रूपांतर करण्याचं एकही उदाहरण नाही. मोदींनी आता आपल्या हातात जळता निखारा घेतला आहे. काश्मीरला वाचवणं आपलं कर्तव्य आहे, असंही दिग्विजय सिंह यांनी सिहोर दौऱ्यावर असताना बोलत होते.

जम्मू काश्मीरमधील कलम 370ला सौरा भागातील सुमारे 10 हजार लोकांनी विरोध केला. या विरोधादरम्यान गोळीबार झाला. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. हे वास्तव आहे, असं दिग्विजय सिंह म्हणाले.

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला दिग्विजय सिंह यांनी संसदेतही विरोध केला होता. मोदी सरकारने कलम 370 हटवल्याच्या निर्णयानंतर जगभरातून याबाबत प्रतिक्रिया आल्या. 

महत्वाच्या बातम्या-

-मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ‘या’ अभिनेत्रीने दुसऱ्या पतीविरोधात घेतली पोलिसात धाव

-भारताचा वेस्ट इंडीजवर 59 धावांनी विजय

-पूरात विखुरलेली घरं सावरण्यासाठी संभाजीराजे सरसावले; जाहीर केली 5 कोटींची मदत

-भाजपला जम्मू-काश्मीरमध्ये कोणी आणलं???; मुफ्ती-ओमर अब्दुल्ला यांच्यात शाब्दिक चकमक

-पवार-महाजन वाद भडकला; आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरवर लघुशंका