नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना ट्विटरवरून घेरण्याचा प्रयत्न केला आहे. सिंग यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एका महिलेचा व्हिडिओ शेअर केला आहे. याच व्हीडिओचा संदर्भ घेत दिग्विजय सिंह यांनी नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे.
व्हिडिओमध्ये ही महिला कोरोना विषाणूविरूद्ध लढण्याच्या सरकारच्या भूमिकांवर अनेक प्रश्न उपस्थित करताना दिसत आहे. केंद्र सरकारने कोरोनाशी लढा देण्याची सर्व जबाबदारी पूर्णपणे सामान्य जनतेच्या खांद्यावर दिली असून, घरामध्ये जनतेलाच बंदिस्त राहावे लागते, जनतेलाच मास्क आणि सॅनिटायझर्स खरेदी करावे लागतात, घरातील नोकरांना काढून न टाकण्याची जबाबदारीही जनतेवरच आहे, लोकांना पगार देण्याची जबाबदारीही जनतेवरच, पंतप्रधानांच्या फंडातही जनतेनेचे मदत द्यायची आहे. मग असे असताना सरकार काय करत आहे?, असा सवाल तिने केला आहे.
ही सगळी जबाबदारी जनतेवर टाकलेली असताना सरकारने मात्र बँकांचे EMI माफ करण्याची सवलत जनतेला दिलेली नाही, असंही या महिलेने व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.
जेव्हा भारतात जानेवारी महिन्यात पहिला करोनाचा रुग्ण आढळला, तेव्हाच परदेशातील भारतीयांना देशात आणून विमान वाहतुकीवर बंदी घालायला हवी होती. मात्र केंद्र सरकारने तसे केले नाही. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत परदेशातून लोक येत राहिले. या व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी यांनी फेब्रुवारी 2020 मध्येच पॅनल तयार करून लॉकडाउनची तयारी करायला हवी होती. मात्र ते मध्य प्रदेश सरकार पाडण्यात, तसेच नमस्ते ट्रम्पसारखे मार्केटिंग इव्हेंट करण्यात गुंग होते, अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
है मोदीशाह जी व मोदी भक्तों के पास इसका कोई जवाब? है तो जवाब दो। pic.twitter.com/nYh00MXGXj
— digvijaya singh (@digvijaya_28) May 5, 2020
महत्वाच्या बातम्या-
-‘तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि परदेशात अडकला असाल तर…’; ठाकरे सरकारचं आवाहन
-‘या’ राज्यात दारूवर 70 टक्के कोरोना फी; सरकारच्या निर्णयाने तळीरामांची पंचायत
-“दारू विक्रीसंबंधी केंद्राच्या सूचना असल्या तरी राज्य सरकारने घाई करू नये”
-‘नीट’ आणि ‘जेईई-मेन्स’ परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर
-काँग्रेस सरकारने चालू केलेल्या अनेक योजना या संकटाच्या काळात प्रभावी ठरतायेत- अभिजीत बॅनर्जी