“जीन्सवाल्या पोरींना पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत नाहीत, ते…”

भोपाळ | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते भोपाळमध्ये जन जागरण अबियानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

जीन्सवाल्या मुलींना पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत नाहीत. केवळ 40 ते 50 वयोगटातील महिलांवरच मोदींचा प्रभाव आहे, असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे. यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

जीन्स परिधान करणाऱ्या आणि मोबाईल बाळगणाऱ्या मुली मोदींमुळे प्रभावित नाहीत. केवळ 40 ते 50 वयोगटातील महिलाच मोदींवर प्रभावित आहेत, असं सांगतानाच 2024 मध्ये मोदी पुन्हा विजयी झाल्यास सर्वात आधी देशाचं संविधान बदललं जाईल, असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे.

जे काही आरक्षण मिळतंय तेही बंद केलं जाईल. कारण भाजप रशिया आणि चीनचं मॉडल फॉलो करत आहेत, असा दावा देखील दिग्विजय सिंह यांनी यावेळी बोलताना केला आहे.

राज्यातील सरकार आणि पोलीस बजरंग दलाला वाचवत आहे. हे मोदींचं सरकार आहे. शिवराज मामूंची वाळू माफियांची गँग आहे. आता त्यांच्याविरोधात लढलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काहीच संबंध नाही हे स्वत: सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलं आहे. तसेच गाय आपली माता होऊच शकत नाही, असंही सावरकरांनी म्हटलं आहे. जी गाय आपल्याच मलमूत्रात पहूडलेली असते ती आपली माता कशी काय असू शकते? असा सवालही सावरकरांनी केला आहे.

गोमांस खाण्यात काहीही गैर नाही. आज भाजप आणि संघ ज्या सावरकरांना आदर्श मानतो त्यांनीच हे सांगितलं आहे, असा टोलाही दिग्विजय सिंह यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

…म्हणून या सर्वात मोठ्या महामारीशी आपण सामना करू शकलो- नरेंद्र मोदी 

‘…तर मी आमदारकीचा राजीनामा देईल’; चंद्रकांत पाटलांचं खडसेंना आव्हान 

रणबीर कपूर हा अजिबात सेक्सी मुलगा नाही, तो आईच्या…- सोनम कपूर 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची 2021 मधील शेवटची ‘मन की बात’; काय बोलणार याकडे देशाचं लक्ष 

एलआयसीची भन्नाट योजना; 1 रुपयाच्या गुंतवणुकीतून मिळवा कोट्यवधीचा फायदा