Uncategorized देश

“राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त अशुभ असल्यामु्ळे भूमिपूजनाअगोदर भाजप नेत्यांना कोरोनाची लागण होत आहे”

अयोध्या | राम मंदिर भूमिपूजनाला आता एक दिवस बाकी आहे. त्याप्रमाणे अयोध्येत जोरदार तयारही चालू आहे. मात्र अजूनही राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या महूर्तावरून राजकीय वातावरण तापलं आहे. अशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगविजय  सिंह यांनी भाजपसो टोला लगावत एक वक्तव्य केलं आहे.

राम मंदिराचा मुहूर्त अशुभ असल्यामुळे भूमिपूजनाच्या अगोदर भाजप नेत्यांना कोरोनाची लागण होत आहे.मोदीजी,  5 ऑगस्टचा अशुभ मुहूर्त टाळा. शेकडो वर्षांनी राम मंदिराचं निर्माण कार्य करण्याचा योग आला आहे. आपल्या हट्टीपणामुळे यात आणखी विघ्न येण्यापासून थांबवावं, असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे.

सनातन धर्म आणि हिंदू परंपरेचं उल्लंघन केल्यामुळे राम मंदिराचे पुजारी कोरोना पॉझिटिव्ह आले. उत्तर प्रदेशच्या मंत्री कमला रानी वरुण यांचं कोरोनामुळं निधन झालं. गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना पॉझिटिव्ह असून रुग्णालयात आहेत, असंही दिगविजय सिंह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अयोध्येमध्ये दिवाळी असल्याप्रमाणे वातावरण आहे. भूमिपूजनाच्या ऐतिहासिक क्षणाला रामलल्लांना रत्नजडित हिरवा मखमली पोषाख घालण्यात येणार आहे. अयोध्येतील शंकरलाल टेलर यांनी खास रामलल्लांसाठी भगव्या रंगाचे कपडे तयार केले आहेत. रामलल्लांचे कपडे शिवणारी शंकरलाल टेलर यांची ही चौथी पिढी आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या लसीवरून WHO प्रमुखांनी केलेल्या ‘या’ वक्तव्यामुळे जगाचं टेन्शन वाढलं; वाचा काय म्हणाले…

गृहमंत्री अमित शहांची तब्येत बरेहोईपर्यंत भाजपचा ‘हा’ नेता ठेवणार रोजा

विकृतीचा कळस! चिमुरडीला पॉर्न दाखवत नराधमानं केला बलात्कार, अन् मग गावकऱ्यांनी उचललं ‘हे’ पाऊल

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत निलेश राणेंचा सरकारचा गंभीर आरोप; जस दिवस जात आहेत तसे…

धक्कादायक! प्रेमाचं नाटक करत विधवा महिलेवर ‘या’ नेत्याने केला बलात्कार