काँग्रेसशी एकनिष्ठ राहून काहीच मिळालं नाही- दिलीप माने

सोलपूर | कार्यकरत्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. काँग्रेसशी एकनिष्ठ राहून काहीच मिळालं नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये थांबणं आता शक्य नाही. लवकरच वेगळा निर्णय घेण्यात येईल, असं म्हणत काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आपल्या शिवसेना प्रवेशाचे संकेत दिले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा होत आहे. त्यांच्या या विधानामुळे ते लवकरच शिवसैनिक व्हायला इच्छुक असल्याचं दिसंतय. उद्या (शनिवार) ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमध्ये वेळोवेळी डावलण्यात आलं. आता योग्य निर्णय घ्यायची वेळ आली आहे. दिलीप माने हाच आमचा पक्ष, त्यामुळे तुम्ही ज्या पक्षात जाल तिथं आम्ही तुमच्यासोबत आहोत. कुठल्याही पक्षात जा मात्र निवडणुक लढाच, असा आग्रह मानेंच्या कार्यकर्त्यांचा आहे. 

कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन तुम्हाला न्याय देता येईल अशाच पक्षात प्रवेश करेन, असा शब्द दिलीप माने यांनी कार्यकर्तांना दिला आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्तांची ब्रह्मदेवदादा माने बँकेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत दिलीप माने यांनी याबाबत भाष्य केलं. 

दरम्यान, दिलीप मानेंच्या या विधानामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. 

महत्वाच्या बातम्या-