“…तर आपल्यावर देखील एक दिवस अशीच वेळ येईल”; वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य

पुणे | आपल्या कार्यकुशल आणि कल्पकतेच्या आधारावर देशात तंत्रज्ञानाची वाढ करणारे माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या स्मृती दिनानिमित्त सर्वजण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राजीव गांधींच्या आठवणींना उजाळा देताना भाजपवर  जोरदार टीका केली आहे.

राज्यात तसेच देशात सध्या मोठ्या प्रमाणावर विविध घडामोडी घडत आहेत. धार्मिक आणि सामाजिक तणाव देखील वाढताना पाहायला मिळत आहे.

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आज आपला देश जी भरीव कामगिरी करत आहे ती सर्व राजीव गांधींची देण आहे. त्यांनी भारताला प्रगतीचा मार्ग दाखवला, असं पाटील म्हणाले आहेत.

आज दुर्देवानं केंद्रात सत्तेत बसलेले लोक देशात, समाजात तेढ निर्माण करता येईल यावर लक्ष केंद्रीत करत आहेत. समाजातील अंतर देखील वाढवण्याचं काम सरकार करत आहे, असा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे.

देशात जर अशात प्रकारचा कारभार सुरू राहीला तर इतर देशांसारखी परिस्थिती आणि त्यांच्यासारखी वेळ आपल्यावर येईल, असंही पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, राजीव गांधींनी देशाच्या तंत्रज्ञानाला दिलेली आधुनिकतेची जोड आज माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राला उंचीवर नेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 जाहीरातदार बीसीसीआयवर भडकले, जाणून घ्या काय आहे प्रकरण

 नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ! दाऊद प्रकरणात न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

 आयपीएलच्या पुढील हंगामात चैन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी पुन्हा धोनीच

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘नवरात्री आणि मांसाहार…’; सोनू निगमच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ