‘डिंपल लग्न करणार नाही तिला विक्रमच्या..’; शेरशाह विक्रम बत्रांच्या वडिलांचा खुलासा

मुंबई | शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जिवनावर आधारित ‘शेरशाह’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. विक्रम बत्रा हे कारगिल युद्धावेळी नायक होते. विक्रम बत्रा यांनी कारगिल युद्धावेळी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

एक धाडसी सैनिक म्हणून बत्रा यांची ओळख आहे. त्यांच्या जिवनात अनेक थरारक किस्से घडले होते. शेरशाह चित्रपटात त्यांच्या जिवनातील अनेक किस्से दाखवण्यात आले आहेत. तसेच या चित्रपटात शेरशहा विक्रम बत्रा यांची लव्हस्टोरी देखील दाखवण्यात आली आहे.

एका मुलाखतीत विक्रम बत्रा यांच्या वडिलांनी विक्रम यांची गर्लफ्रेंड डिंपल चीमा यांच्याविषयी काही खुलासे केले होते. डिंपल केव्हाच लग्न करणार नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं होतं. तसेच यावेळी त्यांनी यामागील कारण देखील सांगितलं होतं.

मुलाखतीत बोलताना ते म्हणाले होते की, डिंपल आणि विक्रम दोघे एकमेकांवर जिवापाड प्रेम करत होते. आमच्या वाढदिवसाला ती वर्षातून दोनदा तरी आम्हाला फोन करते. विक्रम शहीद झाल्यानंतर आम्ही तिला लग्न करण्याचा सल्ला दिला होता, कारण तिच्यापुढे उभं आयुष्य ठाकलं होतं.

तिच्या कुटुंबाने देखील याबद्दल तिला समजावलं होतं. मात्र, तिने सर्वांना साफ नकार दिला होता. तिला आयुष्यभर लग्न करायचं नसून विक्रमच्या आठवणीत जगायचं असल्याचं तिने स्पष्ट केलं होतं, असा खुलासा विक्रमच्या वडिलांनी यावेळी केला होता. तसेच त्यांनी यावेळी डिंपल आणि विक्रम बत्रा यांच्याबद्दल इतरही काही माहिती दिली होती.

डिंपलसोबत लग्न करणार असल्याचं विक्रमने मला सांगितलं होतं. मी देखील त्याला होकार दर्शवला होता. डिंपल एक गुणी मुलगी आहे आणि तिला नातेसंबंधाची जाण आहे, हे मला अगोदरच माहित होतं, असं देखील विक्रम बत्रा यांच्या वडिलांनी यावेळी म्हटलं होतं.

दरम्यान, भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या विक्रम बत्रा यांच्या जिवनावर आधारित असणाऱ्या शेरशाह चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“अर्जुनला इतकी मेहनत करताना पाहून वाटतं की सैफला सोडून त्याच्याशी लग्न करावं”

“सोशल मीडियावर नुसत्या फुलाचा फोटो शेअर केला तरी त्याला हस्तमैथुन…”

‘या’ बड्या अभिनेत्यावर गुन्हा दाखल, महिला रायटरची केली फसवणूक?

अभिषेकच्या ‘या’ गोष्टीवर आहे ऐश्वर्याचं प्रेम, म्हणूनच केलं बीग बींच्या मुलाशी लग्न

…म्हणून कियारा ‘शेरशाह’ चित्रपटात डिंपलची भूमिका साकारल्यानंतर रडली होती; वाचा सविस्तर