‘माझ्या स्तनांची सर्जरी करण्यास सांगितलं अन्…’; दिपिकाचा धक्कादायक गाैप्यस्फोट!

मुंबई | अभिनेत्री दिपिका पदुकोणने आज इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी ती एक आहे. आपल्या अभिनयाच्या आणि साैंदर्याच्या जोरावर तिने अल्पावधितच प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं आहे. मात्र, या उंचीवर पोहचण्यासाठी तिला खूप कष्ट घ्यावे लागले आहेत. याबद्दल दिपिका पदुकोणने स्वत: अनेकवेळा सांगितलं आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीची साैंदर्याची एक स्वत:ची परिभाषा आहे. बॉलिवूडच्या साैंदर्याच्या ठोकताळ्यात बसण्यासाठी इंडस्ट्रीतील नवख्या अभिनेत्री  भरपूर मेहनत घेतात. दिपिका पदुकोणला देखील या ठोकताळ्यात बसण्यासाठी एकेकाळी भरपूर मेहनत घ्यावी लागली होती.

बॉलिवूडमध्ये सुंदर दिसण्यासाठी नवख्या अभिनेत्री अनेक वेगवेळ्या गोष्टी ट्राय करतात. शरीर मोठे आणि उठावदार दिसण्यासाठी अवयवांंमध्ये सिलिकॉन भरणे, ओठांमध्ये सिलिकॉन भरणे, चेहऱ्याची सर्जरी करणे, अशा अनेक अनैसर्गिक गोष्टी केल्या जातात.

नवख्या अभिनेत्रींवर हे सर्व करण्यासाठी दबाव देखील टाकण्यात येतो. दिपिकावर देखील असा दबाव टाकण्यात आला होता. नुकतंच दिपिकाने इंडस्ट्रीत नवीन असताना अशाच आलेल्या अनुभवाविषयी धक्कादायक गाैप्यस्फो.ट केला आहे.

मला जर या चित्रपट सृष्टीत टिकायचं असेल तर मग मी माझ्या ओठांमध्ये सिलीकॉन भरले पाहीजे, माझी फिगर आणखी उठावदार दिसण्यासाठी माझ्या स्तनांची सुद्धा सर्जरी करुन घेतली पाहिजे. यासाठी माझ्यावर भरपूर दबाव टाकण्यात आला होता, असा गाैप्यस्फोट  दिपिका पादुकोणने केला आहे.

इंडस्ट्रीत नवीन असताना दिपिकाला अनेक अनाहूत सल्ले मिळाल्याचं देखील यावेळी दिपिकाने सांगीतलं आहे.  मात्र, यावेळी दिपिकाने फूकटच्या मिळणाऱ्या भोगस सल्ल्यांकडे लक्ष नाही दिलं. तिने आपल्या अभिनयावर आणि स्वत:वर मेहनत घेतली. आणि आज तीने इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर चित्रपट सृष्टीची पडद्याआड लपलेली काळी बाजू हळूहळू समोर येऊ लागली होती. सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो देखील याप्रकरणी तपास करत होती. अं.मली पदार्थ प्रकरणी आत्तापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांची नावे समोर आली आहेत.

अभिनेत्री दीपिका पदुकोनचंही नाव अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आलं होतं. याप्रकरणी एनसीबीनं दीपिकाची चौकशी देखील केली होती. तसेच दीपिका पादुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिच्याही घरी एनसीबीला ड्र.ग्ज आढळले होते.

महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! बाॅलिवूडवर इन्कम टॅक्सची धाड, ‘या’ बड्या कलाकारांवर होणार कारवाई

बिकनी शूटसाठी चक्क दोन दिवस उपाशी, ‘या’ अभिनेत्रीचा अजब खुलासा…

श्रद्धाच्या वाढदिवसानिमित्त वडिल शक्ति कपूर झाले भावूक, म्हणाले…

भारतीय संघातील ‘हा’ वेगवान गोलंदाज लवकरच बांधणार लग्नगाठ

अभिनेत्री कंगना राणैतची सर्वोच्च न्यायालयात धाव, म्हणाली….