समांथासोबतच्या घटस्फोटावर नागाचैतन्यचा मोठा खुलासा, म्हणाला…

मुंबई | दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतील यशस्वी अभिनेत्री समांथा आणि अभिनेता नागाचैतन्य यांना ओळखलं जातं. या जोडीनं काही दिवसांपूर्वीच घटस्फोट घेतला आहे. अशात नागाचैतन्यचं एक वक्तव्य चर्चेत आहे.

समांथा आणि नागाचैतन्य यांच्यात दहा वर्ष मैत्रीपुर्ण संबंध होते. त्यानंतर त्यांनी 4 वर्षापूर्वी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण चार वर्ष झाल्यानंतर त्यांनी एका संयुक्त निवेदनाद्वारे सर्वांना घटस्फोटाची माहिती दिली होती.

समांथा सध्या तिच्या हाॅलिवूड पदार्पणाची तयारी करत आहे. ती फिलीप जाॅन यांच्या सिनेमात दिसणार आहे. परिणामी तिच्या हाॅलिवूड पदार्पणाची सर्वजण वाट पहात आहेत.

अशावेळी नागाचैतन्य आपल्या बंगारराजू या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी त्याला त्याच्या आणि समांथाच्या घटस्फोटाबद्दल विचारण्यात आल्यावर नागाचैतन्यनं महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

आम्ही एकमेकांच्या सहमतीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. हा आमचा निर्णय सर्व गोष्टींचा विचार करून घेण्यात आला होता, असं नागाचैतन्य म्हणाला आहे.

दोघांनी हा निर्णय आनंदानं घेतला आहे. ती आनंदी असेल तर मग मी पण आनंदी आहे. आमच्या नात्यामध्ये अशावेळी घटस्फोट हा सर्वोत्तम पर्याय होता, असा खुलासा नागाचैतन्यनं केला आहे.

आमच्या चाहत्यांनी आणि नातेवाईकांनी आम्हाला भरपूर साथ दिली त्याबद्दल त्याचं आभारी असल्याचंही नागाचैतन्य म्हणाला आहे. अशावेळी सध्या नागाचैतन्यच्या या वक्तव्यांची जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान, घटस्फोटासारखी स्थिती मला झेपावेल असं मला कधी वाटलं नसल्याचं वक्तव्य समांथानं केलं होतं. सध्या दोघेही आपापल्या व्यवसायिक जिवनात व्यस्त आहेत.

महत्वाच्या बातम्या –

5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग

 श्रेयवादाची लढाई सुरू! राज ठाकरेंचा ‘तो’ जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणात अंजली दमानिया पुन्हा आक्रमक

भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘… तर घरीच उपचार घ्या’; जाणून घ्या सरकारच्या या मार्गदर्शक सूचना