मुंबई | अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही एक बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रियंकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीबरोबरंच प्रियंकाने हॉलिवूडमध्ये देखील आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
सध्या प्रियंकानं निकसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. फोटो शेअर करताच क्षणातच तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रियंका बिकिनीमध्ये दिसत आहे आणि तिच्या मागे पती निक जोनस काटा चमचे घेऊन मजेशीर पोझ देत आहे.
प्रियंकाची ही पोस्ट सगळ्यांचच लक्षवेधून घेत आहे. प्रियंकानं शेअर केलेल्या निक जोनाससोबतच्या फोटोवर नेटकरी भडकले आहेत. असे फोटो शेअर करायला लाज वाटत नाही का? अशा आशयाच्या अनेक कमेंट्स या फोटोवर पाहायला मिळताहेत.
या फोटोवर कमेंट करत परिणीतीने प्रियंकाला ट्रोल केलं आहे. प्रियंका ताई, तुमचं हे काय चाललं आहे? इन्स्टाग्रामवर कुटुंबातील माणसंदेखील आहेत, डोळे बंद करत फोटोला लाइक करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी कमेंट परिणीतीने केली आहे.
प्रियंका लवकरच सिटाडेल, टेक्स्ट फॉर यू, मॅट्रिक्स 4 या हॉलिवूड सिनेमात ती झळकणार आहे. याशिवाय ‘जी ले जरा’ या चित्रपटात ती आलिया भट व कतरिना कैफसोबत झळकणार आहे.
प्रियांका चोप्रा सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रीय असते. ती सतत आपले हॉट फोटो आणि व्हिडीओ शेयर करून चाहत्यांना आपल्या अपडेट देत असते. चाहतेही तिच्या पोस्टला भरभरून दाद देत असतात.
बाॅलिवूडमध्ये प्रियंका शेवटची ‘द व्हाइट टाइगर’ चित्रपटात दिसली होती. रमिन बहारानी दिग्दर्शित या चित्रपटात प्रियंकासोबत आदर्श गौरव आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत होते.
महत्वाच्या बातम्या –
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी
शाहरुखची मुलगी सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये राहतेय…
‘तुला बाॅयफ्रेंड आहे का?’ असं विचारणाऱ्या…
अभिनेत्री वैदेही परशुरामीनं खरेदी केली ‘ही’ नवी…
कौतुकास्पद! ‘या’ अभिनेत्रीनं घेतली कचरापेटीत…