मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या प्रकृतीच्या कारणामुळे अयोध्या दौरा स्थगित केल्याची माहिती आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा रद्द झाल्याने संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करत राज ठाकरेंवर टिका केली आहे.
तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा रद्द ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे, असा जोरदार टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.
राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत अयोध्या दौरा तुर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती दिली होती. यावर सविस्तर बोलूच, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरे यांच्या ट्विटचा फोटो शेअर करत यावर सविस्तर बोलूचं, असा टोला देखील लगावला आहे.
राज ठाकरे यांनी गेल्या काही सभांमध्ये महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका मांडली आहे. तसेच मशिदींवरील भोंग्यांवरूनही राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचा उल्लेख हिंदूजननायक असा करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे हिंदुत्ववादी भूमिका मांडताना दिसत आहेत.
राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर शरसंधान साधले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जातीयवादी असल्याची टीका राज ठाकरेंनी केली होती.
दरम्यान, जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी नवा भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे, असं म्हणत राष्ट्रवादीने मनसेला डिवचले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी ! राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया होणार?, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर
मोठी बातमी! काॅंग्रेसचा शिवसेनेवर तब्बल 24 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
आयपीएलचा रोमांच! RCB च्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत पण…
मोठी बातमी! नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
“मुस्लिमांनी आयुष्यभर काँग्रेसला मतदान करून आपली जिंदगी झंड बनवली”