Top news खेळ देश

भारतीय टीममध्ये निवड न झाल्यानं संतापलेला सुर्यकुमार रोहितसमोर मन मोकळे करत म्हणाला…

दिल्ली | आयपीएलच्या या पर्वात अनेक नवीन खेळाडूंनी आपल्या खेळीचं उत्तम प्रदर्शन करत क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. मुंबई इंडिअन्सच्या संघाकडून खेळणाऱ्या सुर्याकुमार यादवनेही या पर्वात आपल्या खेळीने अनेक लोकांची वाहवाह मिळवली आहे.

सुर्यकुमार यादव यावेळच्या आयपीएलमध्ये प्रचंड फॉर्ममध्ये होता. त्याने प्रत्येकच सामन्यात आपल्या उत्तम खेळीचं प्रदर्शन केलं. सुर्याकुमारची खेळी पाहता अनेकांनी सुर्यकुमारची यावेळी ओस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होईल, अशी शक्यता वर्तवली होती. मात्र, सुर्यकुमारची यावेळी देखील भारतीय टीममध्ये निवड होऊ शकली नाही.

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून देखील त्याची भारतीय संघात निवड न झाल्यानं तो प्रचंड नाराज होता. मात्र, तरी देखील सुर्यकुमार आयपीएल दरम्यान खचला नाही. त्याने मुंबई इंडिअन्सला यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

आता मुंबई इंडिअन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने सुर्यकुमारची भारतीय संघात निवड न झाल्यानंतर त्याची अवस्था काय झाली होती? याबद्दल खुलासा केला आहे. आयपीएलच्या एका सामन्याच्या वेळी टीम रूममध्ये बसले असताना काय घडलं याविषयी रोहित शर्माने सांगितलं आहे.

रोहित शर्मा म्हणाला की, एका सामन्यापूर्वी मी आणि सूर्या टीम रूममध्ये बसलो होतो. भारतीय संघात निवड न झाल्यानं सूर्या यावेळी खूप नाराज होता, हे मला जाणवत होतं. पण मी त्याच्याजवळ जावून बसू शकलो नाही.

काही वेळाने सूर्याच माझ्या शेजारी येवून बसला. यानंतर तो मला म्हणाला की, माझी काहीही काळजी करू नकोस. मी या निराशेतून बाहेर येईल आणि मुंबईच्या संघाला सामना जिंकून देईल, असा खुलासा रोहितने केला आहे.

तसेच सूर्या उत्तम खेळत आहे. तो फक्त आयपीएलच नाही तर त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत योग्य दिशेने पुढे जात आहे. त्याची योग्य वेळ नक्कीच येईल, असंही रोहितने म्हटलं आहे.

दरम्यान, आयपीएलच्या या मोसमात मुंबई इंडीअन्सकडून खेळणाऱ्या सुर्यकुमारने प्रत्येकंच सामन्यात उत्तम खेळीचं प्रदर्शन केलं आहे. त्याने 16 सामन्यात तब्बल 480 रन केल्या आहेत. त्याच्या या उत्तम खेळीमुळे मुंबई इंडीअन्सचा संघ 5व्या वेळी आयपीएलची ट्रॉफी जिंकला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतच्या 17 कोटींचा घोटाळा आणि दिनेश विजयन यांचा संबंध काय? वाचा सविस्तर

अंकिता पुन्हा सुशांतच्या आठवणींना उजाळा देत टेलिव्हिजनवर सुशांतसाठी करणार ‘ही’ गोष्ट

एकीकडे पत्नी प्रेग्नंट तर दुसरीकडे सैफ अलीच्या मुलासाठी येत आहेत लग्नाचे प्रस्ताव

अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ गाण्यामुळे आरोह वेलणकर आणि महेश टिळेकर भिडले, एकमेकांवर टीका करत म्हणाले…

…म्हणून आमीर खान अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा! कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल