मुंबई | राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद होताना दिसत आहेत. अशातच आत नगरसेवकांनी मोठा राडा केला आहे.
मिरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नगरसेविकांमध्ये भांडण झाल्याचं समोर आलं आहे. सध्या हे प्रकरण प्रचंड गाजत आहे.
नगरसेविका गिता जैन यांनी शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटाराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नानंतर लगेचच सभागृहात मोठा गोंधळ सुरू झाला.
गीता जैन यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर लागलीच गार्डनमध्ये भाजप नगरसेवकाला बार आणि रेस्टाॅरंटसाठी परवानगी देण्याचा प्रश्न सभागृहात चर्चेला आला.
भाजपच्या नगरसेविका हेतल परमार आणि गीता जैन यांच्यात शाब्दिक वाद चालू झाला. हा वाद इतका वाढला की बाहेरून महिला सुरक्षा रक्षकांना आत बोलावण्याची वेळ आली.
गीता जैन आणि हेतल परमार यांच्यात अपशब्दांचा वापर देखील झाला. त्यानंतर लगेच पाण्याच्या बाटल्या देखील एकमेकांवर उगारण्यात आल्या पण लागलीच भांडण सोडावण्यासाठी इतर नगरसेवक धावून आले.
दरम्यान, भाजप नगरसेविकांमध्येच वाद झाल्यानं चर्चा देखील रंगली आहे. येत्या काळात मिरा भाईंदर महापालिकेची निवडणूक देखील होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“जगू द्याल की नाही?”; राज ठाकरेंचा संतप्त सवाल
संभाजीराजेंचा राज्यसभा मार्ग खडतर?, शिवसेनेनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल
अण्णा हजारेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, दिला ‘हा’ गंभीर इशारा
रोहित पवारांच्या खोचक टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
मोठी बातमी! मोदी सरकारच्या ‘या’ एका निर्णयानं आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ