पटना | बिहारमध्ये सध्या भाजप आणि जेडीयू सत्तेत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार प्रमुख आहेत तर आरजेडी आणि काॅंग्रेस महाआघाडी विरोधात आहेत.
बिहार विधानपरिषदेच्या तब्बल 24 जागांसाठी काही दिवसांमध्ये निवडणूक घोषित होण्याची शक्यता आहे. परिणामी आत्तापासूनच तेथील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीच्या पुर्वीच काॅंग्रेस आणि आरजेडीमध्ये जोरदार शाब्दिक वाद रंगला आहे. हा वाद आता टोकाला जाण्याची शक्यता आहे.
24 जागांपैकी काॅंग्रेसचे स्थानिक नेते 7 जागा आरजेडीकडं मागत आहेत. यावर आरजेडीचे प्रवक्ते मृत्यूंजय तिवारी यांनी काॅंग्रेसवर बोचरी टीका केली आहे. परिणामी वाद वाढला आहे.
विधानपरिषदेच्या जागा म्हणजे काय सत्यनारायणाचा महाप्रसाद नाही. सर्वांना वाटायला, अशी टीका आरजेडीकडून काॅंग्रेसवर करण्यात आली आहे. परिणामी सर्वत्र सध्या याचीच चर्चा चालू आहे.
24 जागांवर विजय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं मत तिवारी यांनी व्यक्त केलं आहे. परिणामी काॅंग्रेसकडून फक्त 7 जागांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे, असंही तिवारी म्हणाले आहेत.
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाआघाडीतील सर्व पक्ष सोबत बैठक घेऊन काय आहे तो निर्णय घेतील. येत्या काळात सर्वांनी भाजपविरोधात लढण्यासाठी उभा राहावं, असंही तिवारी म्हणाले आहेत.
काही दिवसांपूर्वी बिहार विधानसभेच्या काही जागांवर पोटनिवडणूक झाली होती. तेव्हा आरजेडी आणि काॅंग्रेस विभक्तपणे निवडणुकीला सामोरं गेले होते. परिणामी आता विधानपरिषदेच्या जागांबाबत काय निर्णय होतो हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील बिहार सरकारविरोधात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात विरोधकांनी जोरदार मोर्चाबांधणी केल्याचं चित्र सध्या बिहारमध्ये दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या –
“आता कच खाऊ नका”; उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला राज ठाकरेंचा पाठिंबा
गोल्डनमॅन सचिन शिंदे हत्या प्रकरणी खळबळजनक माहिती समोर!
उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी उलथापालथ, भाजपला सलग सातवा झटका
भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘… तर घरीच उपचार घ्या’; जाणून घ्या सरकारच्या या मार्गदर्शक सूचना