मुंबई | स्वातंत्र्यपूर्व भारतापासून आपल्या सुरेख आवाजानं अवघ्या जगातील कोट्यावधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानं एका पर्वाचा शेवट झाला आहे.
लता मंगेशकर यांच्यावर पूर्ण शासकिय इतमामात मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लतादीदींच्या अंत्यविधीसाठी हजेरी लावली होती.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. ठाकरे सरकारनं राज्यभर एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. लतादीदींच्या जाण्यानं देशाच्या सांस्कृतिक अंगाचा एक भाग नाहीसा झाला आहे.
लतादीदींवर शिवाजी पार्क येथे ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या ठिकाणी जागतिक दर्जाचं स्मृतीस्थळ उभारण्यात यावं, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.
लतादीदींच्या मृत्यूनंतर लगेच अवघ्या एका दिवसात राज्यातील राजकारण आता त्यांच्या नावाभोवती फिरणार असल्याची वक्तव्य करण्यात येत आहेत. राम कदम यांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काहींनी शिवाजी पार्कवर स्मृतीस्थळाची मागणी केली आहे. पण तशी मागणी आत्ताच करू नका, कारण लतादिदींच्या स्मारकाचा देशानं विचार करायला हवा, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
लतादीदींच्या स्मृतीस्थळावरून राज्यात राजकारण पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विषयावर कोणीही राजकारण करू नये, असं संजय राऊत म्हणाले आहेत. लतादिदींच्या निधनानंतर राज्यातून नव्हे तर अवघ्या जगातून शोक व्यक्त करण्यात आला आहे.
लतादीदी राजकारणी नव्हत्या, त्या इतक्या मोठ्या व्यक्ती होत्या की त्यांच्या स्मृतीस्थळाचा विचार देशालाही करावा लागेल, असं सुचक वक्तव्यही संजय राऊत यांनी केलं आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानं देशानं आपलं एक अनमोल रत्न गमावलं आहे.
दरम्यान, मुंबईच्या शिवाजी पार्कवर यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ उभारण्यात आलं आहे. परिणामी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासन आता लता मंगेशकर यांच्या स्मृतीस्थळाबाबत काय भूमिका घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शाहरूखला ट्रोल करणाऱ्यांना ऊर्मिला मार्तोंडकरने सुनावलं, मोदींचा ‘तो’ फोटो केला शेअर
दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी; सुप्रिया-शरद पवारांचा हा फोटो ‘का’ होतोय व्हायरल?
लता मंगेशकरांना विष देऊन मारायचा प्रयत्न झालेला?, नेमका काय प्रकार घडला होता?
‘तो’ एक निर्णय, वाद आणि अनेक वर्ष अबोला; ‘या’ कारणामुळे लतादीदी-आशाताईंमध्ये आलेला दुरावा
लग्न झालेलं नसतानाही लतादीदी लावत होत्या सिंदूर; सांगितलं होतं ‘हे’ खरं कारण!