मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर वाद; दोनदा झाले ध्वजारोहण

औरंगाबाद | शहरातील विजयस्तंभाजवळ सकाळी सात वाजता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा (Marathwada Mukti Sangram Din) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केले.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हैद्राबाद येथे विशेष कार्यक्रमात निघून देखील गेले. हैद्राबादमध्ये कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राचा एक संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी हजेरी लावली आहे. त्याचमुळे एकनाथ शिंदे घाईघाईत तेथे गेले असल्याचा आरोप शिवसेनेनेने केला आहे.

एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या पातशहांचे एकतात आणि निर्णय घेतात. त्यामुळे त्यांनी मराठवाड्याच्या मुक्ती दिनाच्या कार्यक्रमाला जास्त वेळ दिला नाही. केवळ पंधरा मिनिटांत त्यांनी कार्यक्रम आटोपला, असे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danave) म्हणाले.

तसेच शिवसेनेने याविषयी आक्रमक पवित्रा घेत विजयस्तंभाच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केले असताना देखील पुन्हा ध्वजारोहण केले आहे. त्यामुळे आता मुक्तीदिनाचा हा वाद चिघळला आहे.

मुख्यमंत्र्यांनी विजयस्तंभाजवळ सकाळी सात वाजता ध्वजारोहण केले आणि ते तेथून तडक हैद्राबादला (Hyderabad) रवाना झाले. दरवर्षी हा कार्यक्रम नऊ वाजता घेण्यात येतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाची वेळ बदलल्याचा निषेध म्हणून शिवसेनेकडून पुन्हा एकदा ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या – 

‘मनसे या दोघांचा बंदोबस्त लवकर करेलच’; राज ठाकरेंचं पत्र चर्चेत

‘सैराट’मधील प्रिन्स अडचणीत; अटक होण्याची शक्यता

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनावरुन शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड; म्हणाले, दिल्लीच्या पातशहांच्या…

लहानग्यांसाठी खूशखबर; पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिली ते चौथी गृहपाठ होणार बंद!

दसरा मेळाव्याला ‘शिवजी पार्क’ सुने सुने राहणार!