राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रत जोरदार पावसाची शक्यता आहे, तर या मध्ये राज्यातील सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान(Weather) विभागाने वर्तविली आहे. तर आज आणि उद्या राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याने तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि दक्षिण कर्नाटकातील काही भागात पुढील तीन ते चार दिवसात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेली दोन आठवडे पावसानं उसंत घेतल्यानंतर, दक्षिण भारतात पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या जवाद चक्रीवादळामुळे पूर्वी किनारपट्टी परिसरात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली होती.

महाराष्ट्रात मात्र पुढील पाचही दिवस कोरड्या हवामानाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पण याठिकाणी पावसाची शक्यता खूपच कमी आहे.

पुढील दोन ते तीन दिवसात सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

देशात सर्वत्र कोरडं हवामान राहणार असल्याने हिमालयातील वाऱ्यांची गती देखील मंदावली आहे. त्यामुळे राज्यात थंडीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुसरीकडे पुण्यातील शिरूर याठिकाणी किमान तापमानाचा पारा 12.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यापाठोपाठ हवेली आणि माळीण याठिकाणी अनुक्रमे 13.3 आणि 13.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“पवार हवेत गप्पा मारणारे नव्हेत, यशवंतरावानंतर महाराष्ट्राला लाभलेलं सर्वात मोठं नेतृत्व” 

 “26 खासदार असणारा गुजराती पंतप्रधान होतो मग 48 खासदार असणारा महाराजांचा मावळा…”

“शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होतं हा इतिहास आहे” 

मद्यप्रेमींसाठी गुड न्यूज; उत्पादन शुल्क विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय  ओ

“बाळासाहेब असते तर संज्याला लाथ मारून हाकलून दिलं असतं”