“युती करायची का नाही… अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील”

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. जागावाटपावर दोन्ही पक्षांकडून विधाने करण्यात येत आहे. युती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. यात आता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी युतीबाबत भाष्य केलं आहे.

युती संदर्भातला निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेत असतात. तसंच आमच्याकडे चर्चा करण्याची पद्धत नसून आवडो किंवा न आवडो पक्षप्रमुख जो निर्णय घेतात तो अंतिम असतो, असं वक्तव्य दिवाकर रावते यांनी केलंय.

राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण असल्यानं भाजपकडून दबाव निर्माण केला जातोय असं शिवसेनेला वाटतं. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना उत्तर म्हणून रावते यांनी हे वक्तव्य केल्याचं बोललं जातंय.

लोकसभा निवडणुकीआधी भाजप आणि सेनेचं मनोमिलन झालं आहे. त्यामुळे यापुढे सर्व निवडणुका शिवसेनेला सोबत घेऊनच लढवणार असं भाजपकडून सांगितलं जातंय.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनीदेखील युतीबाबत बोलताना युती होणार असल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-