नवी दिल्ली | सरकार वेळोवेळी त्यांच्या कर्मचार्यांसाठी DA, DR आणि पगार वाढवण्याची घोषणा करते. काही महिन्यांपूर्वीची वाढ जोडून ही वाढ प्रभावी करण्यात आलीय, त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही थकबाकीचा लाभ मिळू लागलाय.
आधी सरकारने 28 टक्के आणि नंतर वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर त्यात 3 टक्के वाढ केली. डीएप्रमाणेच महागाई रिलीफ किंवा डीआरमध्येही वाढ करण्यात आली.
हा नियम सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. पण बँकांच्या प्रोबेशनरी ऑफिसर्सना आणखी काही वाढ मिळालीय.
दिवाळीपूर्वीच बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वाढीव पगाराचा लाभ मिळालाय. यामुळे कर्मचारी अधिकारी आनंदात आहेत.
सरकारी बँकेत काम करणाऱ्या प्रोबेशनरी ऑफिसर्सचा पगार 40,000 रुपये ते 42,000 रुपये प्रति महिना असतो. यामध्ये मूळ वेतनाचा भाग 27,620 रुपये प्रति महिना आहे.
डीएमध्ये 3 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यामुळे पगारात थेट वाढ झाली. बढतीनंतर बँक पीओचे कमाल मूळ वेतन 42,020 रुपये होते.
केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 3 टक्के महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत वाढीला मंजुरी दिली.
3 टक्क्यांची वाढ मूळ वेतन/पेन्शनच्या सध्याच्या 28 टक्के दरापेक्षा जास्त आहे. सुमारे 47.14 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे 8 लाख बँकर्स आणि सपोर्टिंग स्टाफच्या पगारात वाढ होणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या पगारात नोव्हेंबरपासून वाढ होणार आहे.
ही वाढ लागू झाल्यानं दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली. हा महागाई भत्ता एका तिमाहीसाठी जारी करण्यात आला. ताज्या वाढीसह महागाई भत्ता 30.38 टक्के झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
“फडणवीसांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्यापेक्षा दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावं”
“नवाब मलिकांनी खालचे कपडे काढले नाहीत तर बरं”
“रवी शास्त्री 24 तास नशेत असतात”; आरोपांनी भारतीय टीममध्ये मोठी खळबळ
मोदी सरकारकडून दिवाळी भेट! पेट्रोल आणि डिझेल ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त
”The Lalit’ में राज छुपे है’; नवाब मलिकांकडून भाजपला खास दिवाळी शुभेच्छा