मुंबई | कोरोना महामारीनं गेल्या दीड वर्षापासून सर्वच बाजूंनी नुकसान केलं आहे. अशात आता ओमिक्राॅन या नवीन व्हिरेयंटनं सर्वांना चिंतेत टाकलं आहे.
कोरोना सुरू झाल्यापासून अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवायला लागल्या आहेत. अशामध्ये बाहेर जाऊन व्यायाम करणं पण धोक्याचं झालं आहे.
सातत्यानं शरीराला फिट ठेवण्यासाठी जीमला जाणाऱ्या अनेकांना कोरोना आल्यापासून स्वत:ची आणि परिवाराची काळजी घेण्याच्या कारणामुळे जीमला जाता येत नाही.
अशा परिस्थितीमध्ये सर्वच क्षेत्रांवर निर्बंध लावल्यानं जीमदेखील बंद झाल्या आहेत. मग शरीराला निरोगी ठेवण्यासाठी घरच्या घरी व्यायाम करणं हा एकमेव पर्याय आहे.
कोरोनाला हरवण्यासाठी शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती वाढवणं गरजेचं आहे. परिणामी अनेक तज्ज्ञांनी घरच्या घरी व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे.
दोरी वरून उड्या मारणे हे घरच्या घरी साध्या पद्धतीनं करता येणारा व्यायाम आहे. घराच्या छतावर किंवा हाॅलमध्ये हा व्यायाम केला जाऊ शकतो.
पुश अप हा व्यायामाचा सर्वात जास्त प्रमाणात केला जाणारा प्रकार आहे. अनेक मोठे व्यावसायिक बाॅडी बिल्डरदेखील हा व्यायाम करतात. अगदी सोपा आहे घरच्या घरी करता येतो.
बर्पी हा एक महत्त्वाचा व्यायाम प्रकार आहे. या प्रकारानं अंगातील कॅलेरीजवर परिणाम होतो. परिणामी अनेकजण हा प्रकार करतात. पुल अप्स हा प्रकार एक महत्त्वाचा प्रकार आहे. यामुळं शरीरातील ताण निघून जातो.
पायऱ्या चढणं हा एक प्रकारं शरीरातून घाम काढणारा व्यायाम आहे. अगदी सोप असल्यानं घरच्या घरी करताना घराच्या पायऱ्यांचा योग्यपण वापर करून व्यायाम करता येतो.
दरम्यान, अनेक प्रकारं असल्यानं घरच्या घरी व्यायाम करून कोरोना आणि ओमिक्राॅनच्या या काळातही शरीराला निरोगी ठेवता येतं.
महत्त्वाच्या बातम्या –
“…तर शक्यता नाकारता येत नाही”; लाॅकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य
‘मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरु आहे’; अभिनेता किरण माने प्रकरणावर मलिकांची प्रतिक्रिया
महत्त्वाची बातमी! कोरोनामुळे बंद असलेल्या ‘या’ गाड्या पुन्हा रेल्वे ट्रॅकवर धावणार
‘नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही’; भाजपचा हल्लाबोल
“कंगना रणौतच्या गालापेक्षा जास्त सुंदर रस्ते बनवणार”