Top news आरोग्य

त्वचेवर ‘अशी’ लक्षणं दिसल्यास करु नका दुर्लक्ष, असू शकतो Omicron?

skin e1642214092653
Photo Credit - Pixabay

नवी दिल्ली | ओमिक्राॅनचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ओमिक्राॅनच्या रुग्णसंख्येतही झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग पाहता लोकांमध्ये धास्ती पहायला मिळत आहे. ओमिक्राॅनच्या भीतीनं तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

जगाची चिंता वाढवणारा ओमिक्रॉन सध्या चांगलाच फैलावत चालला आहे. ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतलेली नाही, त्यांच्यासाठी ओमिक्राॅन व्हेरियंट अतिशय घातक आहे.

ओमिक्राॅन हा व्हेरियंट डेल्टाच्या तुलनेत कमी घातक असला, तरीही त्या लोकांसाठी ओमिक्रॉन धोकादायक ठरू शकतो.

कोरोनाच्या लक्षणांमध्ये आणि ओमिक्राॅनच्या लक्षणांमध्ये बरीच तफावत जाणवत आहे. लाल डाग किंवा दादी अंगावर उठतात त्यामुळे खूप जास्त खाज येते. सुरुवातीला तळहात आणि तळपायापासून खाज यायला सुरुवात होते. ही खाज काही तास ते काही दिवसांपर्यंत असू शकते, असं ZOE Covid या स्टडी अॅपवर नोंदवण्यात आली आहेत.

ओमिक्राॅनची लक्षणं दिसल्यास हलक्यात न घेता लगेच डाॅक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा. पुन्हा काही वाढण्यापेक्षा वेळीच सावध झालेलं कधीही चांगलं.

डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंट धोकादायक असून त्यांच्यामुळे रुग्णसंख्या नवे रेकॉर्ड नोंदवत असून रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यूंचं प्रमाणही वाढत आहे.

ओमिक्राॅनच्या धास्तीनं अनेक ठिकाणी लाॅकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांनी निर्बंधांचे सक्तीनं पालन करावे असं वारंवार सांगण्यात येत आहे. सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  संतापजनक! पुन्हा सुरु झालेल्या एसटीवर दगडफेक, प्रवासी थोडक्यात बचावले 

  राज्यात ओमिक्राॅनची तिसरी लाट येणार?; रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय वाढ

  केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; सरकारकडून मिळणार खास गिफ्ट

 IPL 2022: मेगा ऑक्शनपूर्वी ‘या’ 3 खेळाडूंना मिळू शकते लखनऊमध्ये डायरेक्ट एन्ट्री

CDS जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताबद्दल ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर