कोरोना काळात ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, नाहीतर होऊ शकते गंभीर स्थिती

गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

हा विषाणू शरिरात गेल्यावर त्याचा थेट परिणाम आपल्या रोगप्रतिकार शक्तीवर होत आहे. आता तर सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे.

कोरोनाचा सामाना करता-करता अनेक लोकांचा मृत्यूही होत आहे. सध्या सगळीकडची परिस्थिती खूपच भयंकर होत चालली आहे. त्यामुळे सगळ्यांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचं झालं आहे.

सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या लाटेत कोरोना आणखीन नवीन लक्षणं समोर येत आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तसेच आज आम्ही तुम्हाला कोरोनाची काही लक्षणं सांगणार आहोत. जर ती तुम्हालाही ती लक्षणं जाणवत असतील, तर त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका.

सतत खोकला येणे- जर तुम्हाला खोकला जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. नाही तर त्याचा थेट परिणाम तुमच्या छातीवर होऊ शकतो. तसेच तुम्हाला श्वसनाचाही त्रास होऊ शकतो.

भूक न लागणे- आता सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसांमध्ये आपल्याला जास्त काही खाऊ वाटत नाही. सारखं पाणी प्यावसं वाटते. परंतू जर तुम्हाल भूक लागतच नसेल, तर ही बाब गंभीर असू शकते. त्यामुळे जर तुम्हाला असं जाणवत असेल, की तुम्हाला काही खावसंच वाटतं नाहीय. तर लगेचच नजिकच्या रूग्णालयात जाऊन डॉक्टरांना सांगा.

थकवा येणे- बऱ्याच वेळा आपल्याला काम केल्यानंतर थोडंसं थकल्यासारख जाणवतं. परंतू जर तुम्हाला साधे-साधे काम केल्यानंतरही खूप दमल्यासारखं होत असेल, तर लगेचच डॉक्टरांना ही समस्या सांगा.

दरम्यान, सध्या सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे खूप गरजेचं झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-  

जाणून घ्या! कोरोना वॅक्सिन घेणे का गरजेचं आहे?

विहिरीमध्ये तो सापासोबत पोहत होता अन्…, हलक्या…

साखरपुडा झाल्यानंतर ‘हे’ कारण सांगून नवरदेवाचा…

IPl 2021: शतकाच्या जवळ असताना पडिक्कल म्हणाला, ‘मॅच…

काय सांगता! ट्रेनऐवजी रेल्वे ट्रॅकवर आला चक्क हात्ती…