शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला उमेदवारी देऊ नका; उद्धव ठाकरेंना पत्र

पालघर : आयात आमदार विलास तरे यांना उमेदवारी देऊ नये म्हणून बोईसर विधानसभेतील 90 पैकी तब्बल 54 शाखांनी थेट उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिली आहेत. नुकतेच काही दिवासांपूर्वी आमदार विलास तरे यांनी बहुजन विकास आघाडीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र स्थानिक शिवसैनिकांकडून तरेंच्या उमेदवारीला सध्या जोरदार विरोध होत आहे.

बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांना शिवसेनेने बोईसर विधानसभेसाठी आयात उमेदवार केल्याने शिवसेनेत मोठा कलह आहे. विलास तरे यांच्या उमेदवारीला बोईसर विधानसभेतील निष्ठावान शिवसैनिकांचा विरोध होत आहे.

स्थानिक उमेदवाराला विधानसभेची उमेदवारी मिळावी. आयात उमेदवार नको अशी मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे.

विलास तरे हे गेले दोन टर्म बोईसर विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले आहेत. बहुजन विकास आघाडीतून त्यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. 2009 ला ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते.

बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे यांनी शिट्टी सोडून धनुष्यबाण हातात घेतला. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे निष्ठावान शिवसैनिक यांची दखल घेऊन विलास तरे यांचा पत्ता कट करतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या-