पणजी | देशात सत्तांतराचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. सर्वप्रथम महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले आणि ते राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या या बंडाला भाजप कारणीभूत आहे, असे विरोधी पक्षांचे मत आहे.
त्यांच्यापाठोपाठ बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपसोबत असलेली युती तोडत काँग्रेस (INC) आणि राजदसोबत (RJD) घरोबा केला आणि ते आठव्यांदा बिहारचे नव्याने मुख्यमंत्री झाले.
आता तशाच प्रकराचे बंड गोव्यात पहायला मिळाले आहे. गोव्यात काँग्रेसचे अकरा आमदार आहेत. त्यांच्यापैकी आठ जणांनी काँग्रेसला शेवटचा रामराम केला आणि भाजपात प्रवेश केला.
त्यामुळे महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात देखील मोठी बंडखोरी झाली आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat), विरोधी पक्षनेते मायकल लोबो (Michel Lobo) यांच्यासह काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केला.
त्यामुळे आता गोवा विधानसभेत काँग्रेसचे फक्त तीन आमदार उरले आहेत. भाजप प्रवेशानंतर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावळी पत्रकारांनी त्यांना त्यांनी निवडणुकीपूर्वी देवांसमोर घेतलेल्या शपथेबाबत विचारणा केली.
त्यावेळी ते म्हणाले, मी मंदिरात गेलो होतो. मी देवी-देवतांना विचारले की मी भाजपमध्ये जाण्याचा विचार करीत आहे, मी काय करु? तेव्हा देवी-देवतांनी मला सांगितले, डोन्ड वरी, जा भाजपमध्ये.
मागील गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्यातील सर्व आमदारांनी मंदिर, मशिद आणि चर्चमध्ये जाऊन आणाभाका घेतल्या होत्या की, आम्ही काहीही झाले, तरी काँग्रेसमध्येच राहू.
पाच वर्षे आम्ही काँग्रेस सोडणार नाही, असे सर्व उमेदवारांनी म्हंटले होते. तसेच काँग्रेसने सर्वांकडून एकनिष्ठेतेचे प्रतिज्ञापत्र देखील घेतले होते. तरी देखील काँग्रेसला मोठा धक्का मिळाला.
महत्वाच्या बातम्या –
“अजित पवारांना मुख्यमंत्री करा”, जाणून घ्या सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री शिंद्यांना काय दिली ऑफर?
दसरा मेळावा वाद: युवासेनेचा शिंदे गटाला मोठा इशारा, म्हणाले शिवतीर्थ…
फ़ॉक्सकॉन प्रकरणी अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना आरोपांचे पत्र; वाचा सविस्तर पत्र
भाजप आणि मनसे युती होणार का? सरचिटणीस संदीप देशपांडेंनी केला खुलासा
बच्चू कडू यांना अटक; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला