Top news आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

Corona | कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर ‘या’ गोष्टी सर्वात आधी करा

corona new

मुंबई | राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे.

एकीकडे रुग्ण संख्या वाढत आहे तर दुसरीकडे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. नियमांचं पालन करत काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. अशात तज्ज्ञांनी सर्वांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर पाच दिवसांनी किंवा लक्षणे दिसू लागताच त्वरित कोरोना टेस्ट करून घ्या असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत स्वतःला विलगीकरणात ठेवा. याशिवाय लक्षणे जाणवत असली, तरी त्यानंतरही रिपोर्ट निगेटिव्ह येत असेल, तर पुन्हा पुन्हा टेस्ट करून घ्या, असं त्यांनी म्हटलंय.

एखाद्या व्यक्तीला विषाणूची लागण झाल्यानंतर दोन ते 14 दिवसांत कोरोना विषाणूची लक्षणे दिसू शकतात. यासाठीच आपण प्रथम चाचणी करावी आणि नंतर स्वतःला अलगीकरणात ठेवावं. कारण, काही लोकांना लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे ते नकळत व्हायरस पसरवू शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे.

जर तुम्हाला त्याची कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब तपासणी करा. हिवाळ्यात फ्लू आणि सर्दीच्या लक्षणांचा धोका जास्त असतो, त्यामुळे या लक्षणांकडेही दुर्लक्ष करू नका, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यातील कालचा आकडा तर चिंता अधिक वाढवणारा आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात 41 हजार 434 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

तर 9 हजार 671 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात राज्यात 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

आपल्याला लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचं नाही- उद्धव ठाकरे 

JIO च्या ग्राहकांसाठी खुशखबर; ‘या’ Plan वर मिळतोय जबरदस्त कॅशबॅक 

 “संजय राऊतांना जगावर बोलण्याचा अधिकार, त्यांना सर्व जगाचं कळतंय”

राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ स्टॉकमधील गुतंवणूक केली कमी! 

लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…