नवी दिल्ली | कोरोनाचं थैमान पुन्हा सुरु झाल्यानं नागरिकांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कोरोनाचा नव्यानं उदयास आलेला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron variant) कहर जगभर पाहायला मिळतोय.
कोरोनाचं नवं रुप जास्त खतरनाक असून थोडीशी चुकीही महागात पडून कोरोना होण्याची शक्यता असते. अशात तज्ज्ञांनी सर्वांना महत्वाचा सल्ला दिला आहे.
परदेशातून आलेल्या डेटावरून असे दिसून येते की, ओमिक्रॉन हे सौम्य लक्षण आहे. मात्र भारतासाठी अद्याप कोणताही डेटा नाही. वृद्ध आणि गंभीर आजाराने ग्रस्त लोकांसाठी हे अद्याप धोकादायक आहे, असं राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉ. पीयूष जैन यांनी म्हटलं आहे.
सफदरजंग रुग्णालयाचे कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. जुग किशोर म्हणाले की, एचआयव्ही किंवा इतर कोणत्याही संसर्गाची लागण झालेल्या लोकांनी घराबाहेर जाणं टाळावं. अशा लोकांनी वेळेवर औषधे घ्यावी आणि पुरेशी झोप घ्यावी, असंही त्यांनी म्हटलंय.
वारंवार हात धुत राहणं, मास्क लावणं यासोबतच खाण्यापिण्याच्या गोष्टींकडेही लक्ष देण्याची गरज आहे. या काळात आपण असं जेवण घेतलं पाहिजे की जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल आणि गंभीर आजारांपासून आपल्याला वाचवेल. आहारासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना , ज्यामुळे आपला कोरोनापासून बचाव होऊ शकतो.
आपल्याला आपल्या जेवणात वेगवेगळ्या प्रकारची ताजी फळं आणि ताज्या अन्नाचा समावेश ठेवायला हवा. ज्या अन्नपदार्थांमधून आपल्याला विटामीन, मिनरल्स, फायबर, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडेंट मिळतील, अशा गोष्टी आहारात असायला हव्यात.
प्रत्येक दिवशी कमीत कमी दोन-चार ताजी फळं, किमान दोन ताज्या भाज्या, 180 ग्रॅम धान्य आणि शक्य असेल तर 160 ग्रॅम मांस खायला हवं. आठवड्यातून एक दोनदा रेड मीट आणि दोन तीन वेळा चिकन खाऊ शकता. संध्याकाळी भूक लागली तर कच्च्या भाज्या किंवा ताजी फळं खा.
भाज्यांना जास्त उकळून खाऊ नका नाहीतर त्यातील महत्त्वाची पोषकद्रव्यं निघून जातील. हवाबंद अन्न खात असाल तर लक्ष द्या की त्यात साखर तसेच मिठाचं प्रमाण जास्त नसावं.
महत्वाच्या बातम्या-
पुढील 24 तास महत्त्वाचे; राज्यातील काही भागात पावसाची शक्यता
‘या’ महिन्यात भारतात दररोज 2 लाख रूग्ण आढळतील, तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ
“…त्यावेळी मला अनेकांनी वेड्यात काढलं”; द डर्टी पिक्चरबाबत विद्या बालनचा खुलासा
“नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकार घालवण्याचा संकल्प केलाय”
WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, म्हणाले…