तुम्हालाही गोरी आणि चमकदार त्वचा हवी आहे का?, मग हा घरगुती स्क्रब नक्की वापरुन पाहा

मुंबई | आजकाल शारिरीक आरोग्य राखण्यासोबतच त्वचेचंही आरोग्य राखणं गरजेचं झालं आहे. सध्याच्या जगात प्रदुषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात साैंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या त्वचेला तजेलदार आणि हायड्रेट ठेवताना खूप कष्ट घ्यावे लागतात. तसेच या धकाधकीच्या लाईफ स्टाईलमध्ये आपण आपले नैसर्गिक सौंदर्य गमावू लागलो आहोत.

आपण कोणत्या न कोणत्या कामासाठी रोज घराबाहेर जात असतो. त्यावेळी आपल्या त्वचेवर बारीक मातीचे कण, याचबरोबर अनेक असे घटक बसतात की जे आपल्या त्वचा खराब करणारे असतात. यासाठी आपल्या त्वचेवरील मृ.त पेशी, त्याचबरोबर उन्हात गेल्याने होणारे टॅनिंग घालवण्यासाठी त्यावर आपण घरगुती उपाय करु शकतो.

स्क्रब केल्याने मृ.त त्वचेचा थर काढून टाकल्याने आपल्या त्वचेची नैसर्गिक चमक परत येते. त्वचेच्या वेगवेगळ्या प्रकारानूसार आम्ही तुम्हाला वेगवेगऴ्या स्क्रबची रेसेपी सांगणार आहोत.

कोरडी त्वचा- 

तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही चेहरा मॉईश्चराईज होईल अशा गोष्टी वापरल्या पाहिजेत. या प्रकारच्या त्वचेसाठी एक चमचा कॉफी पावडरमध्ये अर्धा चमचा मध, शुद्ध तूप आणि पाणी एकत्र करुन पेस्ट बनवा. पेस्ट लावल्यानंतर हलक्या हातांनी हळूहळू 4 ते 5 मिनिटांसाठी मसाज करा आणि चेहरा पाण्याने धुवा.

सामान्य त्वचा- 

तुमच्या त्वचेचा प्रकार सामान्य असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे स्क्रब वापरु शकता. चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी ब्राऊन शुगर आणि ऑलिव्ह ऑईलची पेस्ट करुन चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा आणि काही वेळाने चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.

तेलकट त्वचा- 

तेलकट त्वचा असणाऱ्या लोकांना जास्त स्क्रब करण्याची आवश्यकता नसते. परंतू मृ.त त्वचा दूर करण्यासाठी स्क्रब फायदेशीर ठरते. तेलकट त्वचा असेल तर दही, ओट्स आणि मध एकत्र घेऊन याची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटे झाल्यानंतर हलक्या हाताने किंवा बोटांनी स्क्रब करा आणि नंतर थंड पाण्याने धुवून टाका.

संवेदनशील त्वचा-

संवेदनशील त्वचेची विशेष काळजी घेणे हे खूप आवश्यक असते. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील असते, ते लोक स्क्रबिंग टाळतात. परंतू मृ.त त्वचा काढून टाकण्यासाठी पिठाच्या कोंड्यामध्ये कोरफड जेल आणि मध मिसळून पेस्ट करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर अगदी हलक्या हाताने मालिश करा आणि थोड्यावेळाने थंड पाण्याने चेहरा धुवून टाका.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…