घरात सोनं ठेवताय? आता सरकारला द्यावी लागू शकते घरातील सोन्याची माहिती

नवी दिल्ली | सोन्याचे दागिने हे बहुतांश लोकांच्या हौसेचं साधन असतं. लोक सोन्याचे दागिने करून विशेष प्रसंगी घालण्यासाठी घरात ठेवत असतात. मात्र, आता बेकायदेशीरपणे घरात ठेवलेल्या सोन्यासाठी एॅम्नेस्टी प्रोग्रॅमवर अर्थ मंत्रालय विचार करत आहे.

एॅम्नेस्टी प्रोग्रॅमद्वारे सरकारला कर चुकवणाऱ्यांवर अंकुश ठेवायचा आहे. त्याबरोबरच सोन्याच्या आयातीवरील अवलंबन कमी करायचा आहे. नुकताच अर्थ मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला आहे.

प्रस्तावामध्ये म्हटलं आहे की, सरकारने लोकांना आवाहन करावे की बेकायदेशीररित्या ठेवलेल्या पिवळ्या धातूबद्दल करविभागाला माहिती द्यावी. बेकायदेशीररित्या ठेवलेल्या सोन्यावर लोकांना आकारणी करावी लागेल किंवा दंड भरावा लागेल. मात्र सरकारकडून अद्याप याबाबतीत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सोन्याच्या किंमतीमध्ये यावर्षी 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे सोन्याच्या भाववाढीला आणखी मदत केली आहे. येणाऱ्या काळात सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या-

आता धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे पण राज्य सरकारची तशी तयारी दिसत नाही- देवेंद्र फडणवीस

राम मंदिराच्या भूमिुपूजनावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; राम मंदिराचं भूमिपूजन आत्ता न होता…

राम मंदिराच्या भूमिुपूजनावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; राम मंदिराचं भूमिपूजन आत्ता न होता…

आताही सांगतो, हे सरकार फार काळ टिकणार नाही कारण…- राज ठाकरे

निष्ठावंतांना कात्रजचा घाट!; राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यपदी ‘या’ तरुणाची निवड?