बिअर पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?, जाणून घ्या!

नवी दिल्ली | मद्यप्रेमींचं सर्वात जुनं आणि लोकप्रिय प्येय म्हणजे बिअर. चहा, काॅफीनंतर बिअरचं सर्वात जास्त घेतलं जाणारं प्येय आहे. अनेकांना बिअर पिणं योग्य वाटत नाही. मात्र बिअर पिण्याचेही आरोग्यदायी फायदे असतात. योग्य प्रमाणात बिअर घेतली तर त्याचे बरेच फायदे आहेत.

बिअर पिण्याचे आरोग्यदायी फायदे –

1. बिअर मर्यादित प्रमाणात घेतली गेली तर आरोग्याला अनेक प्रकारे फायदे होऊ शकतात. बिअर पिल्यानं हाडांचे,सांध्यांचे दुखणे कमी असते. काही संशोधनानुसार, आठवड्यातून तीनदा आणि प्रमाणात बिअर प्यायल्यास अर्थ्राईटीसचा त्रास कमी करण्यास मदत होते.

2. बिअरमध्ये आढळणारे हेट्रोसाइकिलिक अमीन्स तत्त्व कर्करोगाला कारणीभूत ठरणारे धोकादायक व्हायरसला नष्ट करतात. हृद्याच्या रक्त वाहिन्या अधिक लवचिक बनतात. बिअर प्यायल्यानंतर सुमारे तासाभरातच रक्तपुरवठा सुधारायला मदत होते.

3. बिअरमध्ये व्हिटॅमिन ई असते.  व्हिटॅमिन ई एक प्रभावी अँटिऑक्सिडेन्ट आहे. निरोगी आणि तजेलदार त्वचेसाठी बिअर फायदेशीर ठरते. कमी प्रमाणात आणि नियमीत सेवन केल्यास त्वचा तजेलदार आणि तेजस्वी राहते.

4. जर एखादी व्यक्ती दिवसाला एक किंवा दोन ग्लास बिअरचं सेवन करते तर त्याची हाडं फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण कमी होतं. जर बिअरचं अतिसेवन केल्यास हाड फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण वाढू शकतं, असं एका संशोधनातून समोर आलं होतं.

5. बिअर शाम्पू केसांचे आरोग्य खुलवण्यासाठी फायदेशीर ठरते. बिअरमध्ये व्हिटॅमिन बी आणि यिस्टचे प्रमाण मुबलक असल्याने बिअरचा वापर केल्यानं केसातील कोंड्याची समस्या कमी होते. नियमित आठवड्यातून 2-3 दिवस बिअरने केस  धुणे फायदेशीर ठरते. 

6. बिअर पिण्यामुळे धमन्या मोकळ्या होतात आणि यकृतातील कोलेस्टेरॉल कमी होते. बिअरमधील कडू घटक चांगल्या कोलेस्टेरॉलला वाढवतो.

7.  बिअर पिल्याने स्टोन विरघळतो आणि लघवीद्वारे बाहेर येतो. म्हणूनच अनेक लोक किडनी स्टोनच्या वेळी बिअर पिण्याची शिफारस करतात.

बिअरचं सेवन प्रमाणात केल्यावर तुम्हालाही याचे आरोग्यदायी फायदे होतील. बिअर नियमीत घेत असाल तर  पण ते 350 मिलिग्रॅम पेक्षा जास्त घेऊ नये.

महत्वाच्या बातम्या –

…अन् पठ्ठ्यानं लसीकरण प्रमाणपत्रावरील क्यूआर कोडच टॅटू म्हणून काढला, पाहा व्हिडीओ!

मुलगा हिरो झाला म्हणून मी किसिंग सीन करायचे नाही का? – जॅकी श्रॉफ

ती वॉश बेसिनमध्ये पाय धुवायला गेली अन् बदकन आदळली; पाहा व्हिडीओ

झूम मिटिंग सुरू असताना अचानक कॅमेरा सुरू झाला अन् शिक्षकाचं बेडवरील कृत्य सर्वांसमोर आलं

वरुण धवन ठाकरे सरकारवर संतापला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…