तुम्हाला लवंग खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे माहित आहेत का? जाणून घ्या

दैनंदिन जीवनात आपण लवंगला मसाल्यच्या पदार्थ म्हणून वापरत असतो. लवंगीला आयुर्वेदात सगळ्या मसाल्यांचा गुरू असं मानलं जातं. लवंग जेवणाची लज्जत तर वाढवतातच याशिवाय आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असते.

लवंगेचा एक काळ सर्दी, पडसे किंवा खोकल्याकरिता घरगुती औषध म्हणून मोठा वापर होता. विडय़ाच्या पानाबरोबर मसाल्यात वापर म्हणून लवंग असे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरते.

तोंडातली दुर्गंधी दूर करण्यासाठी लवंग उत्तम आहे. एक लवंग तोंडात ठेवून जास्त वेळ चघळल्याने श्वास मोकळा होतो आणि तोंडाची दुर्गंधी दूर पळते. तोंडाच्या प्रत्येक समस्येवर लवंग हा रामबाण उपाय आहे.

लवंग तिखट, कडू रसाची असून लघु गुणांची म्हणून डोळय़ांना हितकारक आहे. पाचक व रुची उत्पन्न करणारी प्रामुख्याने कफ विकारावर व काही प्रमाणात पित्त व कफ विकारावर काम करते. ग्रंथाप्रमाणे लवंग अग्निप्रदीपक, पोटदुखी, तहान, खोकला, कफ, दमा, उचकी, क्षय, मुखदरुगधी, उलटी, पोटदुखी, रक्तविकार इत्यादींवर काम करते.

लवंगातील गॅस्ट्रिक रसामुळे पचनक्रिया सुधारते. यासाठी 2 लवंग किसून ते अर्धा कप पाण्यात घालून उकळून प्या. लवंग गॅस, जळजळीसारख्या समस्यांवर गुणकारी ठरते. त्याचबरोबर अॅसिडिटीचा त्रास ज्या लोकांना आहे त्यांनी 2-3 लवंग बारिक करून त्यात कपभर पाण्यात टाकाव्या. हे मिश्रण प्यायल्याने अॅसिडिटीचा त्रास लगेच कमी होतो.

लवंगाच्या तेलात अॅँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे पिंपल्सपासून सुटका मिळण्यास याचा फायदा होतो. पिंपल्स चेहऱ्यावर पसरत देखील नाहीत. चेहऱ्यावरील डाग दूर होतात. लवंगाचा लेप देखील तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.

लवंगमध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे ती डोळ्यांसाठी लाभदायक ठरते. क्षिण झालेली डोळ्यांची शक्ती वाढवते. दिवसातून दोनदा लवंग टाकलेला चहा घेतल्याने चेहऱ्यावरचा ग्लो वाढतो. शरीरातील टॉक्सिन्स दूर होतात.

कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी दररोज एक लवंग खायला हवी. ह्रदय रोग्यांसाठी लवंग गुणकारी आहे. आयुर्वेदात मधुमेहावर लवंग लाभदायी असल्याचे सांगितले आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी लवंग लाभदायी ठरते.

महत्वाच्या बातम्या –

‘महिला सुरक्षेचे विषय तरी किमान राजकारणाच्या पलिकडे असले पाहिजे’ – देवेंद्र फडणवीस

‘मला ‘या’ दिवशी एक दिवसाचा मुख्यमंत्री करा’; अभिजीत बिचुकलेंचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

गुडन्यूज! छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार ‘हा’ अभिनेता, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी?’ म्हणत, नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर ह.ल्लाबोल

‘अधिवेशनाच्याआधी संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर…’; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सूचक इशारा