सावधान! औषधांच्या पाकिटावरील या ‘लाल रेषे’चा अर्थ तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर

मुंबई | आपण केव्हा मेडिकल मधून आणलेल्या गोळ्या औषधांवर काय लिहिले आहे किंवा काय चिन्हे आहेत हे पाहिले आहे का? कदाचित नाही. कारण आपल्यापैकी बरेचजण या औषध गोळ्यांच्या लेबलवर दिलेल्या कोड्सकडे किंवा माहितीकडे लक्ष देत नाहीत. पण आरोग्य मंत्रालयाने याबद्दल इशारा दिला आहे.

आपल्याला हलका ताप असेल, डोकेदुखी असेल किंवा इतर काही असेल  तर आपण डॉक्टरांकडे जाण्याऐवजी मेडिकलमध्ये किंवा लोकल स्टोअरमध्ये जावून तिथून गोळी घेवून येतो. पण ही गोष्ट तुम्हाला गंभीर आजारी पाडू शकते.

मेडिकल स्टोअरमध्ये ज्ञानी व्यक्ती नसेल तरीही आपण कोणतीही औषधं विचार न करता घेतो आणि ती खातो. बऱ्याचवेळा या गोष्टीमुळे अनेकजण गंभीर आजारी पडतात. त्यामुळे औषधांच्या पाकिटावर असलेल्या इशाऱ्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.

औषधांच्या पाकिटावर तुम्ही बऱ्याचवेळा लाल रंगाची रेष पाहिली असेल. या लाल रेषेचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? डॉक्टर, फार्मासिस्ट आणि तज्ज्ञांच्या तुलनेत सामान्य लोकांना याबद्दल माहिती नसते.

अनेक औषधांच्या पाकिटावर लाल रंगाची रेष असते. या लाल रंगाच्या रेषेचा असा अर्थ होतो की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय हे औषध विकणे अथवा त्यांचे सेवन करणे प्रतिबंधित आहे.

फार्मासिस्ट चंदन साह यांच्या म्हणण्यानुसार, अँटीबायोटिक्सचा चुकीचा वापर रोखण्यासाठी फक्त औषधांच्याच पाकीटावर लाल रंगाची पट्टी लावली जाते. औषध विक्रेत्याने देखील डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अशी औषध विक्री करु नये.

तसेच अनेक औषधांच्या पाकीटावर आरएक्स असं लिहिलेले असते. या आरएक्सचा अर्थ असा आहे की, असे औषध केवळ आणि  केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतले पाहिजे. काही औषधांवर एनआरएक्स देखील लिहिलेले असते. या एनआरएक्सचा अर्थ असा होतो की, ही औषधे घेण्याची परवानगी केवळ असेच डॉक्टर देऊ शकतात, ज्यांना या औषधांची विक्री करण्यास परवाना मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

डॉक्टरांचा गंभीर इशारा! कोरोना लस घेतल्यानंतर ‘हे’ 5 दुष्परिणाम दिसू शकतात

काय सांगता! चार महिन्यात सोनं साडेसात हजाराहून अधिक तर चांदी पंधरा हजाराहून अधिक उतरली; वाचा सविस्तर

मराठा आरक्षणाचा ओबीसी आरक्षणावर काय परिणाम होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

भाजपच्या ‘या’ आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा जागीच मृ.त्यू

खुशखबर! “डिसेंबर मध्येच लशीला परवानगी मिळेल अन् जानेवारीत लशीकरण चालू होईल” – आदर पुनावाला