पिझ्झा कमी खाल्ल्यानं वजन कमी होतंय का?, साराने दिलं भन्नाट उत्तर

नवी दिल्ली | सोशल मीडियावर दररोज काही ना काही नवीन गोष्टी बघायला मिळतात. सोशल मीडियावरील अॅप फेसबुक आणि इन्स्टाग्राममुळे लोकांना नवीन शिकण्यासाठी मिळतंय.

सोशल मीडियावर अभिनेत्री, खेळाडू इन्स्टाग्रामवर सक्रिय असतात. सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या पोस्टमुळे सतत चर्चेत असते.

सारानं इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. ज्याच्यात तिला चाहत्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले आणि सारानं मजेशीर उत्तरही दिली.

लाईव्ह सेशनच्या वेळी साराला, वजन कमी करायचं असेल तर पिझ्झा खाणं सोडावं लागेल का? असा प्रश्न विचारला. चाहत्याच्या या प्रश्नला सारानं हटके अंदाजात उत्तर दिलं.

तुम्ही थोडा खाऊ शकता पण संपूर्ण (इतना सारा) नाही अर्थातचं एवढा सगळा (इतना सारा) नाही, असं भन्नाट उत्तर साराने दिलं आहे.

साराने तिच्याच नावाचा वापर करून उत्तर दिल्यानं एकच हास्यकल्लोळ उडाल्याचं पहायला मिळालं. या व्यतिरिक्त तिने इतर प्रश्नांवर देखील मजेशीर उत्तरं दिली.

दरम्यान, इन्स्टाग्रामवर साराला प्रश्न विचारणाऱ्या चाहत्याला तिनं मजेदार अंदाजात उत्तर दिलं. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“स्त्रीयांच्या खासगी आयुष्यावर बोलणं चुकीचं, ही मानसिकता बदलावी लागेल”

  Gold Rate: आजचे सोन्याचे दर काय? जाणून घ्या एका क्लिकवर

  गोळीबाळानंतर ओवेसींच्या सुरक्षेत वाढ, आता देणार Z सेक्युरिटी

  मोठी बातमी! बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, वादग्रस्त वक्तव्य भोवलं

  पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी अडचणीत; ईडीनं केली ‘ही’ मोठी कारवाई