“चड्डीत रहायचं समजलं काय, आमचे महाराष्ट्र सैनिक कधी मटन करी…”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुडीपाडवा सभेनंतर राज्यातील वातावरण तापलेलं आहे. मनसे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उल्लेख खाज ठाकरे करत जोरादार निशाणा लगावला होता. साहेबांवर बोलले म्हणून मी खाजसाहेब बोललो, असं मिटकरी म्हणाले आहेत.

मिटकरींच्या या टीकेला मनसे नेते संदिप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीच्या गॅसवर तयार झालेल्या मटण करींनी जरा सांभाळून रहा, असं मिटकरी म्हणाले आहेत.

ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही. तेंव्हा चड्डीत रहायचं काय समजलं?, असा थेट इशारा संदिप देशपांडे यांनी दिला आहे.

अमोल मिटकरींनी राज ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधल्याने आता मनसे नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, येत्या 5 तारखेला राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. त्यामुळे फक्त महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष आता राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याकडे लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“होय, मी मान्य करतो”, अखेर गुणरत्न सदावर्तेंची कोर्टात कबुली

राज ठाकरे नव्हे ‘खाज’ ठाकरे; अमोल मिटकरींनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

“माजी कृषी मंत्री राहिलेल्या शरद पवार यांना हे माहिती नाही का?”

“भाजप पक्षाला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे” 

मोठी बातमी! फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादायक माहिती उघड