Top news आरोग्य

तुम्हालाही चमकदार त्वचा हवी आहे का? मग ‘हे’ उपाय जरूर करा

चमकदार आणि गोरी त्वचा तर सर्वांनाच हवी असते. महिलांप्रमाणे पुरुषांनाही अनेक त्वचेच्या समस्यांना सामोरं जाव लागतं. वयानुसार वाढत जाणाऱ्या त्वचेच्या समस्या आत्मविश्वास देखील कमी करत असतात. चेहऱ्यावर पिंपल्स, कोरडी त्वचा, तेलकट त्वचा, ब्लॅकहेड्स, यांसारखे एक ना अनेक समस्या स्त्रियांप्रमाणे पुरुषांनाही असतात.

त्वचेची योग्य काळजी कशी घ्यायची हे माहित नसल्यानं या समस्या दिवसेंदिवस वाढतंच जातात. आपली त्वचा सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी काही सोपे उपाय असतात. मात्र, आपण या धावपळीचे जगात त्याकडे दुर्लक्ष करतो. आज आपण जाणून घेवूयात त्वचेला निरोगी ठेवणाऱ्या याच उपायांविषयी.

प्रथम तर आपण आपल्या त्वचेचा प्रकार जाणून घ्यायला हवा. आपली त्वचा कोरडी, तेलकट की मिश्र स्वरूपाची आहे हे आपण जाणून घ्यायला हवं. आपल्या त्वचेचा प्रकार आपल्या लक्षात आल्यास त्यावर उपाय करणं आपल्याला सोप्प जातं. यामुळे प्रथम त्वचेचा प्रकार जाणून घेणं आवश्यक आहे.

त्वचेला सुंदर ठेवण्यासाठीचा मूलमंत्र म्हणजे सीटीएम. सीटीएम म्हणजेच क्लीन्जिंग, टोनिंग, मॉयश्चरायजिंग. या तीन गोष्टी आपल्या त्वचेसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. आपण दिवसातून कमीत कमी दोनवेळा चेहरा स्वच्छ केला पाहिजे.

आज बाजारात खूप सारे टोनर उपलब्ध आहेत. आपल्या चेहऱ्याच्या प्रकारानुसार आपण टोनर निवडला पाहिजे. तसेच गुलाबजलचा देखील आपण चेहऱ्यावर वापर केला पाहिजे.

टोनिंगप्रमाणेच मॉयश्चरायझिंग देखील खूप महत्वाचं आहे. जर त्वचा तेलकट असेल तर पाण्यावर आधारित मॉयश्चरायझिंगचा वापर केला पाहिजे. कोरडी त्वचा असेल तर तेल आधारित जाड मॉयश्चरायझर वापरले पाहिजे.

बहुतेकवेळा फक्त उन्हाळ्यात सनस्क्रिम लावली जाते. मात्र, डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे वर्षभर सनस्क्रीमचा वापर केला पाहिजे. सनस्क्रीम आपल्या त्वचेला सूर्यकिरणांपासून होणाऱ्या परिणामापासून वाचवते.

चेहऱ्यावर वेळच्यावेळी स्क्रब करणे देखील गरजेचं आहे. चेहऱ्यावर स्क्रब केल्यानं त्वचेवरील छिद्र बंद होण्यापासून रोखली जातात आणि त्वचेतील घाण दूर होते. त्वचा संवेदनशील असेल तर आठवड्यातून एक किंवा दोन वेळाच स्क्रब करावं.

तसेच उत्तम आहार घेणं हे फार महत्वाचं आहे. यामुळे जर सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असेल तर आपण निरोगी आहार घेत आहोत का?, याची खात्री करून घेणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

…मी फक्त ‘या’ एका गोष्टीसाठी लग्न केलं; राधिका आपटेचा धक्कादायक खुलासा

पक्षांतर करताच कोणी किती भूखंड घेतलेत असं म्हणत एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा!

एकनाथ खडसे यांच्यासह ‘या’ 72 नेत्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश!

भाजपला मोठं खिंडार! भाजपच्या ‘या’ आमदाराच्या पत्नीसह दोन माजी आमदार खडसेंसोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार

सुशांत प्रकरणी हृतिक रोशनच्या आईनं मौन सोडलं! सुशांतबद्दल संभ्रमात टाकणारी पोस्ट करत म्हणाल्या…